मुंबई : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना भारतीय जनता पक्षाने गोव्यात तिकीट नाकारले यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग केली. (Goa Election news Sanjay Raut's 'batting' for Manohar Parrikar's son )
गोव्याचा विकासात मनोहर पर्रिकर यांच्या मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना विशेषतः त्यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना जी वागणूक देत आहे ते चुकीचे आहे. उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यावे यासाठी जो दबाव बनत आहे. त्यात आम्ही सामील आहोत. जर उत्पल यांना पणजीतून तिकीट भाजपने दिले नाही. तर दुसरा पर्याय राऊत यांनी यावेळी सुचवला.
भारतीय जनता पक्षाने जर मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांना तिकीट दिले नाही. तर गोव्यात जेवढे पक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सर्वांनी मिळू उत्पल यांना विजय करण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असे मत संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.