Mumbai : या पुलावरील फेरीवाले हटवून रस्ता होणार मोकळा, मुख्यमंत्र्यांचे BMC आयुक्तांना आदेश

Andheri Gokhale Bridge: पूर्व आणि पश्चिम अंधेरीला जोडणारा गोखले पूल फेरीवालामुक्त करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसी आयुक्तांना निर्देश दिले.

Gokhale Bridge in Andheri will be free of hawkers!
Mumbai : गोखले पुलावरील फेरीवाले हटवून रस्ता होणार मोकळा, मुख्यमंत्र्यांचे BMC आयुक्तांना आदेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गोखले पूल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी
  • मुख्यमंत्री शिंदेंचा पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना फोन
  • लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : अंधेरीतील गोखले पूल धोकादायक असल्याने पोलिसांनी काही दिवसांपासून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. या निर्णयाची कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने गेल्या काही दिवसांपासून अंधेरीच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागात राहणाऱ्या नागरिकांना अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशीही बोलून या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Gokhale Bridge in Andheri will be free of hawkers!)

अधिक वाचा : AURANGABAD | अब्दुल सत्तरांच्या घरावर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड, फडणवीसांनी दिला सरकारमधील मंत्र्यांना समज

धेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल हा धोकादायक झाल्याने वाहतूक पोलिसांनी तो काही दिवसांपासून पूर्णपणे बंद केला आहे. या निर्णयाची कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.हा पूल बंद झाल्यामुळे अंधेरी पश्चिमेकडील एस व्ही रोड, लिंक रोड, जे पी रोड,इर्ला जंक्शन, शॉपर्स स्टॉप येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. तसेच हा पुल बंद केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी करायची नविन सिग्नल यंत्रणा देखील वाहतूक पोलीसनी कार्यान्वित केलेली नाही.

अधिक वाचा : एकनाथ शिंदे 50 आमदारांना खोके देताहेत पण... रामदास कदम बोलले..

वाहतूक कोंडीचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा. जोपर्यंत पुलाचे काम होत नाही तोवर हे फेरीवाले हटवून रस्ता मोकळा ठेवावा असे स्पष्ट आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबलसिंह चहल याना दिले. त्याचबरोबर रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून गोखले पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला प्राधान्य देऊन तो लवकरात लवकर पूर्ण करावा आशा सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी