Mumbai milk price : मुंबईत गोकुळ दूध संघाची दरात वाढ, आजपासून प्रतिलीटरच्या किंमतीत वाढला 'इतका' दर

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 31, 2022 | 07:37 IST

चहा (tea) म्हटलं म्हणजे अनेकांना जीव की प्राण असंच होतं असतं. परंतु हा अनेकांना अमृततुल्य वाटणारा चहा मुंबईकरांना (Mumbaikar) महागडा (expensive) होणार आहे, किंवा मुंबईकरांना कमी दुधाचा चहा घ्यावा लागणार आहे. कारण गोकुळ दूध संघाकडून (Gokul Milk Union) दुधाची दरवाढ (price increase) करण्यात आली आहे.

Gokul Milk Union price increase in Mumbai
मुंबईकरांना घ्यावा लागेल कमी दुधाचा चहा, जाणून घ्या का?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दुधासाठी पशुंना चांगले खाद्य द्यावे लागते. खाद्याच्या दरात वाढ झाल्यास उत्पादन खर्च वाढतो.
  • या पार्श्वभूमीवर दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • रविवारपासून प्रतिलीटर दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली.

मुंबई : चहा (tea) म्हटलं म्हणजे अनेकांना जीव की प्राण असंच होतं असतं. परंतु हा अनेकांना अमृततुल्य वाटणारा चहा मुंबईकरांना (Mumbaikar) महागडा (expensive) होणार आहे, किंवा मुंबईकरांना कमी दुधाचा चहा घ्यावा लागणार आहे. कारण गोकुळ दूध संघाकडून (Gokul Milk Union) दुधाची दरवाढ (price increase) करण्यात आली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. जनावरांच्या खाद्यात वाढ झाली. खाद्याचा खर्च हा जास्त झाला. त्यामुळं ही दरवाढ करणे आवश्यक आहे. 

दुधासाठी पशुंना चांगले खाद्य द्यावे लागते. खाद्याच्या दरात वाढ झाल्यास उत्पादन खर्च (cost of production) वाढतो. अशावेळी दूध उत्पादकांना भाववाढ मिळणे आवश्यक असते. पशूखाद्य तसेच जनावरे सांभाळण्याचा खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Also : झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

एक-दोन रुपये दुधाच्या दरात वाढ करून दूध उत्पादकांना (producers) खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात दोन रुपये प्रतिलीटर, तर गाईच्या दुधाच्या दरात एक रुपये प्रतिलीटर वाढ करण्याचा निर्णय गोकुळ दूध संघाने घेतला आहे. याचा फायदा दूध उत्पादक व संघालाही होणार आहे. 

म्हशीच्या दुधासाठी मोजावे लागणार 66 रुपये, गायीच्या दुधात वाढला रुपया

गोकुळ दूध संघाने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. रविवारपासून प्रतिलीटर दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली. आता आजपासून मुंबईत म्हशीच्या एक लीटर दुधासाठी 66 रुपये मोजावे लागतील. आधी म्हशीचे दूध प्रतिलीटर 64 रुपये होता. या वाढीव दराचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

Read Also : लाखो पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, ईपीएफओ​​ची नवी सुविधा

गाईच्या दुधाच्या दरात प्रतिलीटर एक रुपये वाढ करण्यात आली. म्हशीच्या दरात दोन रुपये प्रतिलीटर वाढ करण्यात आली. याचा फायदा दूध उत्पादक शेतकरी तसेच गोकुळ दूध संघालाही होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून प्रतीलीटर एक ते दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी