Gold Price Today: सोन्याचा भाव झाला कमी, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजारातील भाव

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 21:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Price: सोने चांदीच्या भावात शुक्रवारी घट दिसून आली. कमकुवत जागतिक कलामुळे दोन्ही धातूंच्या किंमतीत घट दिसून आली.  

gold price down by rs 196 per 10 gram silver by rs 956 on 8 november in delhi sarafa business news in marathi google newsstand
सोन्याचा भाव झाला कमी, चांदीही झाली स्वस्त  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  कमकुवत जागतिक कलामुळे दोन्ही धातूंच्या किंमतीत घट दिसून आली.  सोन्याच्या दरात  १९६ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price Today) ३८ हजार ७०६ रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे.  बुधवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ३८ हजार ९०२ रुपयांवर बंद झाला होता. 

 सोन्यात जशी घट आली तशी घट चांदीतही दिसून आली. चांदीचा दर प्रति किलो मागे ९५६ रुपयांची घट झाली. त्यामुळे हा दर प्रतिकिलोला ४५ हजार ४९८ रुपये झाला. बुधवारी हा दर ४६ हजार ४५४ रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक कल कमकुवत असल्याने दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर  १९६ रुपयांनी कमी झाला. 
 
 दरम्यान क्रेडीट रेंटींग एजन्सी मुडी द्वारा भारताच्या आर्थिक विकासासाठी व्याज दर कमी केल्यानंतर रुपये विनिमय दरात मोठी घट दिसून आली आहे. आता ही घट सिमित झाली आहे. 


 
 त्यांनी सांगितले की, आजच्या कारभारात डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैसे कमकुवत होता. सुरूवातीच्या व्यापारात शुक्रवारी रुपयात सकारात्मक कल दिसून आले त्यावेळी ३० पैसे तुटून ७१.२७ रुपये होता.आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट दिसून आली १४७१ डॉलर प्रति औंस तर चांदी १७.०६ डॉलर प्रति औंस हा दर होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...