खुशखबर! राज्यातील मॉन्सूनबाबत मोठी अपडेट; यंदा सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 12, 2022 | 15:43 IST

राज्यात यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 880 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

98% chance of average rainfall this year
मॉन्सूनचा अंदाज वाचून बळीराजा सुखावणार  |  फोटो सौजन्य: Indiatimes

मुंबई : राज्यात यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 880 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये स्कायमेटने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. तो या कायम ठेवला आहे. ला निना आणि एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही असं स्कायमेटने म्हटले आहे. 

राज्यात तापमानात किंचित घट झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाळी स्थिती असल्यामुळे पारा खाली आलाय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात आणखी दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.  सोलापुरात काल वादळी वारे, गारांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे, शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले. कासेगावांत गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी