SSC And HSC Exam । मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरण्यासाठी आकारण्यात येणारे विलंब शुल्क माफ करण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरल्यानंतर विलंब शुल्कासह (late Fee) विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागतो. त्यात लेट फीचेही टप्पे असतात, अनेकदा हा लेट फी हजाराच्या घरात जाते. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेला रिजिस्ट्रेशन करत नाहीत. यंदा मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत नियमित शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज भरता येईल असे स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! दहावी-बारावी परीक्षा ठरल्या वेळेनुसारच आणि ऑफलाइन पद्धतीनेच होणार
याबाबत मंडळाने शाळा, कॉलेजांना पत्र पाठविले आहे. ज्यात मंडळाने म्हटले आहे की, दहावीच्या परीक्षेसाठी २७ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत आणि बारावीसाठी १९ डिसेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह (late Fee) अर्ज (form) भरण्याबाबत तारखा मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. या दरम्यान विलंब शुल्क आकरण्यात येऊ नये, विलंब शुल्क माफ करण्यात यावे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात यावी असे शासनाने निर्देश दिले.
त्या अनुषंगाने मार्च-एप्रिल २०२२ वर्षासाठी विलंब शुल्क माफ करण्यात आले. त्यासह परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
अधिक वाचा : Maharashtra SSC HSC Exam: दहावी, बारावी ऑनलाइन परीक्षा अशक्य - वर्षा गायकवाड
राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काल राज्यात १८ हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळले. मार्च-एप्रिलदरम्यान राज्य शिक्षण मंडळाच्या होणाऱ्या लेखी परीक्षांसाठी लवकरच आढावा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असून त्यासाठीचे वेळापत्रकही गेल्या महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.