CIDCO लॉटरी विजेत्यांना खुशखबर, महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी केवळ १ हजार रुपये मुद्रांक शुल्क

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 05, 2020 | 22:54 IST

CIDCO houses stamp duty: सिडको महागृहनिर्माण योजनेतील विजेत्यांना सिडकोने एक आनंदाची बातमी दिली आहे. या लॉटरी विजेत्यांकडून सिडको अवघे १ हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारणार आहे. 

CIDCO
सिडको  

थोडं पण कामाचं

  • सिडको महागृहनिर्माण योजनेतील सदनिकाधारकांना मोठा दिलासा
  • या योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी केवळ १ हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारणार 
  • सिडको विजेत्यांना दिवाळीची भेट 

नवी मुंबई : सिडको (CIDCO)च्या महागृहनिर्माण योजने अंतर्गत २०१८ (Mega Housing Scheme 2018) रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीतील लाभार्थ्यांना (Lottery winners) एक मोठा दिलासा देणारा निर्णय (Big relief) सिडकोने घेतला आहे. महागृहनिर्माण योजनेतील सदनिकाधारकांना घरांच्या नोंदणीसाठी आता केवळ १ हजार रुपये (Only Rs. 1 thousand stamp duty) भरावे लागणार आहेत. सिडकोने घेतलेल्या या निर्णयामुळे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत (PMAY) पात्र लाभार्थ्यांना घराच्या नोंदणीसाठी केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. 

सिडको महागृहनिर्माण योजनेतील सदनिकाधारकांना मोठा दिलासा 

या संदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे (CIDCO PRO Priya Ratambe) यांनी टाइम्स नाऊ मराठीला (Times Now Marathi) माहिती दिली की, "राज्य शासनाच्या घरांसाठी करारनामा करतेवेळी रुपये १०००/- इतके मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करत सिडको महामंडळानेही आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महागृहनिर्माण योजनेपैकी ज्या घरांसाठी सोडत काढण्यात आली होती, त्या घरांसाठी करारनामा करतेवेळी रुपये १,००० /- (रुपये एक हजार) मात्र, इतके मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयामुळे या योजनेतील लाभार्थी सदनिकाधारकांना करारनामा करतेवेळी सदर शुल्क आकारण्याचे मुद्रांक शुल्क विभागाला कळविण्यात येईल."

एकूण १४,८३८ सदनिकांसाठी काढण्यात आली होती लॉटरी

सिडकोने नवी मुंबईत आपल्या महागृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत २ ऑक्टोबर २०१८ रोजी घरांची लॉटरी काढली होती. या योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (पंतप्रधान आवास योजना) आणि अल्प उत्पन्न गट याकरिता नवी मुंबईतील अकरा ठिकाणी एकूण १४,८३८ घरे (सदनिका) उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या योजनेची संगणकीय सोडत २ ऑक्टोबर २०१८ रोजी पार पडली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी