Mumbai Local Train: लोकल रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर; आता थेट गोरेगाव ते पनवेल आणि सीएसटीचा प्रवास झाला सोपा, लगेच मिळतील गाड्या

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 30, 2021 | 10:02 IST

Mumbai Local Train:लोकल रेल्वेने (Local Train) प्रवास (Travel) करणाऱ्यासाठी प्रवाशांसाठी (Passengers) एक मोठी बातमी आहे. दररोज लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास रेल्वे विभागाने सोपा केला आहे.

Good news for local train passengers
आता थेट गोरेगाव ते पनवेल आणि सीएसटीचा प्रवास झाला सोपा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गोरेगाव ते हार्बर मार्गावर ज्या गाड्या धावत होत्या त्या उशिराने आपल्या स्टेशनवर पोहचत होत्या.
  • गोरेगावकडून थेट सीएसटी आणि पनवेलला जाण्याचा प्रवास करणं सोपं झालं.
  • पश्चिम मार्गावरील प्रवाशांना हार्बर मार्गावरील स्थानकांशी जोडण्याची मागणी मुंबईकरांकडून केली जात होती.

Mumbai Local Train:  मुंबई : लोकल रेल्वेने (Local Train) प्रवास (Travel) करणाऱ्यासाठी प्रवाशांसाठी (Passengers) एक मोठी बातमी आहे. दररोज लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास रेल्वे विभागाने सोपा केला आहे. गोरेगावकडून थेट सीएसटी (CST) आणि पनवेलला (Panvel) जाण्याचा प्रवास करणं सोपं झाले आहे. आता गोरेगाव (Goregaon) ते पनवेल आणि गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. 

म्हणजेच पश्चिम लाईनच्या प्रवाशांना पनवेल जाण्यासाठी वडाळा किंवा अंधेरी किंवा कुर्लामध्ये रेल्वे बदलण्याची गरज राहणार नाही. सीएसटी जाण्यासाठीही गाड्या बदलण्याची गरज आता नसणार आहे. गोरेगाववरुन सीएसटी जाण्यासाठी दादर किंवा अंधेरीला रेल्वे बदलावी लागत होती. रेल्वे विभागाकडून घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांचा प्रवास अगदी सहज सोपा झाला आहे. या निर्णयामुळे आता सीएसएमटी आणि अंधेरीच्या दरम्यान होणाऱ्या 44 फेऱ्यांची वाढ थेट गोरेगावपर्यंत करण्यात आली आहे.

 दरम्यान सीएसएमटी आणि गोरेगावच्य दरम्यान रेल्वेच्या 42 फेऱ्या होत आहेत. आधी पनवेल आणि अंधेरीच्या दरम्यान रेल्वेच्या फेऱ्या ह्या 18 होत होत्या आता त्याचा विस्तार करत त्यांना गोरेगावपर्यंत वाढविण्यात आले आहे. याशिवाय सीएसएमटी आणि बांद्रापर्यत धावणाऱ्या दोन गाड्यांचा प्रवास गोरेगावपर्यंत करण्यात आला आहे.  

पश्चिम-मध्य आणि पश्चिम-हार्बर मार्गांच्या थेट कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांना आराम 

रेल्वेच्या या निर्णयामुळे आता गोरेगावच्या एकूण फेऱ्या ४२ वरून १०६ पर्यंत वाढविण्यात आहे. हार्बर मार्गावरील फेऱ्यांची संख्या 614 पर्यंत वाढणार आहेत आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या 262 फेऱ्या असतील. मुंबई आणि आसपासच्या लोकल ट्रेनच्या एकूण फेऱ्या सध्या 1774 आहेत.पश्चिम मार्गावरील प्रवाशांना हार्बर मार्गावरील स्थानकांशी जोडण्यासाठी लोकल सेवा वाढविण्याची मागणी मुंबईकरांकडून सातत्याने होत होती. गोरेगाव ते हार्बर मार्गावर ज्या गाड्या आता धावत होत्या त्यांच्या कमी फेऱ्यांमुळे खूप उशिराने आपल्या स्टेशनपर्यंत पोहचत होत्या.

त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी प्रवासी अंधेरी, वडाळा किंवा कुर्ला येथे जाऊन वाशी, पनवेल मार्गावरील गाड्या पकडत असत. तसेच मध्य मार्गावर गोरेगाव येथूनही गाड्या धावत होत्या. पण ती पण खूप उशिरा यायची. त्यामुळे दादरमध्ये गाड्या बदलणे लोकांना सोपे वाटले. मात्र आता गोरेगाव ते पनवेल आणि सीएसएमटी या थेट गाड्यांची फ्रीक्वेंसी वाढवण्यात आली असून प्रवाशांचा प्रवास सुकर झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी