Mobile Ticketing App UTS: लोकल प्रवाशांसाठी खूशखबर; उद्यापासून मोबाइल तिकिटींग अॅप युटीएस सुरू

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 23, 2021 | 18:38 IST

Mobile Ticketing App UTS:लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा आहे. मोबाइल तिकिटींग अॅप (Mobile ticketing app) युटीएस सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

local Train -mobile ticketing app UTS launches from tomorrow
लोकल ट्रेनच्या प्रवासासाठी मोबाइल तिकिटींग अॅप युटीएस सुरू  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • युटीएस अॅप हे महाराष्ट्र सरकारच्या लसीकरण प्रमाणपत्र पोर्टलशी जोडण्यात आले आहे.
  • लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचे तिकीट मिळणार आहे.
  • 18 वर्षाखालील मुलांना 15 ऑक्टोबरपासून रेल्वे प्रवासासाठी पास दिला जाऊ लागला आहे.

Mobile Ticketing App UTS: मुंबई :  लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा आहे. मोबाइल तिकिटींग अॅप (Mobile ticketing app) युटीएस सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. युटीएस अॅप (UTS app) हे महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) लसीकरण प्रमाणपत्र पोर्टलशी (Vaccination Certificate Portal) जोडले गेले आहे. त्यामुळे युटीएस अॅपमधून तिकिट घेताना संबंधित प्रवाशाचे लसीकरण झाले असल्याची खातरजमा होणार आहे.

कोरोना काळात मुंबईची लाइफ लाइन समजली जाणारी लोकल रेल्वे बंद ठेवण्यात आली होती. आपात्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. लसीकरणाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर लोकल प्रवासाची मागणी वाढू लागली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने 10 महिन्यानंतर सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरू केला. दरम्यान या कोरोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर युटीएस अॅपवरून तिकिट बुकिंग बंद करण्यात आले होते. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, युटीएस अॅपमधून तिकिट बुकिंग करण्याची मुभा देण्यात आली नव्हती. 

युटीएस अॅपमधून तिकिट घेताना संबंधित प्रवाशाचे लसीकरण झाले असल्याची खातरजमा होणार आहे. लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचे तिकीट मिळणार आहे. राज्य सरकारने लोकलची तिकीट्स विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. मात्र, त्यामुळे काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण होते. रेल्वे ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली होती.

त्यानंतर सरकारने रेल्वेला पत्र लिहून लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अशा सर्वच प्रवाश्यांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अशा सूचना देखील राज्य सरकारच्या पत्रात होती. 

18 वर्षाखालील मुलांना प्रवासासाठी पास

18 वर्षाखालील मुलांना आणि काही वैद्यकीय कारणांमुळे लस घेऊ न शकलेल्या नागरिकांना 15 ऑक्टोबरपासून रेल्वे प्रवासासाठी पास दिला जाऊ लागला होता. 18 वर्षाखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार. यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासासाठी पास देण्याचा निर्णय घेतला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी