ST Employees Salary updates: एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हे सकारात्मक पाऊल उचललं आहे. या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं आहे. (Good News for Maharashtra ST Employees state government disbursed 300 crores for salaries read details in marathi)
राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटलं, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर 2022 च्या वेतनासाठी 2022-23 मध्ये गृह (परिवहन) विभागाच्या 2041 0018 - 33, अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली केलेल्या तरतूदीमधून 300 कोटी रुपये प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर 300 कोटी रुपये हा खर्च 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.
हे पण वाचा : मकरसंक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका हे काम
किमान वेतन हे वेळेत मिळावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने न्यायालयात दात माहितली होती. या संदर्भात न्यायालयाने निकाल देताना म्हटले, प्रत्येक महिन्याच्या देय तारखेला पगार दिला पाहिजे. तर प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 दारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, असे असतानाही पगार वेळेत न झाल्याने एसटी कर्मचारी त्रस्त झाले होते.
हे पण वाचा : जेवणात चुकून पडले जास्त मीठ तर असे करा झटक्यात कमी
गेल्याकाही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला असतानाही पगार न झाल्याने एसटी कर्मचारी चांगलेच संतापले होते. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आपली नाराजी व्यक्त करत काम बंदचा इशारा सुद्धा दिला होता. आता, राज्य सरकारने या संदर्भात पावलं उचलत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.