MPSC Prelims Exam 2022: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर,  पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, होणार इतक्या पदांची भरती

राज्य लोकसेवा आयोगाच्या २१ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर राज्य लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा २०२२ होणार आहे. जाहिरातील गट 'अ' ५९, तर गट 'ब' साठी १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी अशा एकूण १६१ पदांची भरती होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

Good news for MPSC students, date of pre-examination has been announced
MPSC Prelims Exam 2022: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २१ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर राज्य लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा २०२२ होणार आहे.
  • जाहिरातील गट 'अ' ५९, तर गट 'ब' साठी १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी अशा एकूण १६१ पदांची भरती होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
  • पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारावर मुख्य (Main)परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख २१, २२, २३ जानेवारी २०२३, रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.

मुंबई :  गेली अनेक वर्ष सरकारी नोकरी लागणार या प्रतिक्षेत असलेल्या तरुण-तरूणींसाठी एक खुशखबर आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससी (MPSC)परीक्षेच्या पूर्व परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यातील विविध प्रकारच्या पदासाठी जी भरती करण्यात येणार आहे, त्याची तारखेची घोषणा केली आहे.  महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. 

अधिक वाचा : ​आंद्रे रसेलची पत्नीचे सुंदर फोटो पाहून तुम्हीही व्हाल फॅन

 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण १६१ पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ ची जाहिरात (क्रमांक ०४५/२०२२) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

२१ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर राज्य लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा २०२२ होणार आहे. जाहिरातील गट 'अ' ५९, तर गट 'ब' साठी १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. .

अधिक वाचा : ​पुस्तकाच्या गावानंतर आता सातार्‍यात मधाचे गाव, वाचा सविस्तर

पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारावर मुख्य (Main)परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख २१, २२, २३ जानेवारी २०२३, रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. नगरपालिकांमधील मुख्याधिकारी पदे, बालविकास प्रकल्प अधिकारी पदे, राज्य उत्पादन शुल्क विभागातील सहाय्यक आयुक्त तसेच अन्य पदे आदी विविध प्रकारची १६१ पदे या भरती परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.


पदांचा तपशील पुढीलप्रमाणे -

  1. सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा - एकूण पदे ९
  2. मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद - २२ पदे
  3. बाल विकास प्रकल्प अधिकारी - २८ पदे
  4. सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क - २ पदे
  5. उप अधीक्षक, राज्य उत्पादन शु्ल्क - ३ पदे
  6. कक्ष अधिकारी - ५ पदे
  7. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी - ४ पदे
  8. निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था व अन्य - ८८ पदे
  9. एकूण पदांची संख्या - १६१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी