Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, नव्या उड्डाणपुलामुळे मढ ते वर्सोवा प्रवास फक्त 10 मिनिटांत

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 25, 2023 | 08:41 IST

Good news for Mumbai, Madh to Versova journey in just 10 minutes via 4 lane flyover bridge : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मढ ते वर्सोवा उड्डाणपुलाला एमसीझेडएमएने मंजुरी दिली

Good news for Mumbai, Madh to Versova journey in just 10 minutes via 4 lane flyover bridge
नव्या उड्डाणपुलामुळे मढ ते वर्सोवा प्रवास फक्त 10 मिनिटांत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
  • नव्या उड्डाणपुलामुळे मढ ते वर्सोवा प्रवास फक्त 10 मिनिटांत
  • पूल मुंबई महानगरपालिका बांधणार

Good news for Mumbai, Madh to Versova journey in just 10 minutes via 4 lane flyover bridge : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मढ ते वर्सोवा उड्डाणपुलाला महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए / Maharashtra Coastal Zone Management Authority : MCZMA) मंजुरी दिली आहे. हा पूल मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai or Brihanmumbai Municipal Corporation : MCGM or BMC) बांधणार आहे. पुलासाठी 700 कोटी रुपयांचा खर्च होईल असा अंदाज आहे. 

मढ बेट ते वर्सोवा हे अंतर स्वामी विवेकानंद मार्गाने (एस. व्ही. रोड) पार करण्यासाठी 45 ते 90 मिनिटे लागतात. रस्त्यावरील वाहतुकीच्या (ट्रॅफिक) प्रमाणानुसार प्रवासाचा वेळ कमी जास्त होतो. पण पूल तयार झाल्यानंतर मढ बेट ते वर्सोवा हे अंतर पुलावरून झटपट पार करता येईल. प्रवासाचा वेळ 7 ते 10 मिनिटांवर येऊन पोहोचेल. मढ बेट ते वर्सोवा हा उड्डाणपूल 01.05 किलोमीटर लांब आणि 27.05 मीटर रुंद असेल. 

मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर (ट्रॅफिक जॅम) उपाय म्हणून उड्डाणपुलांचे (फ्लायओव्हर) जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या संख्येने उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. या विकास कामांतर्गत मढ बेट ते वर्सोवा असा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. 

मालाड पश्चिमेकडील मढ परिसर आणि अंधेरीतील वर्सोवा हा भाग समुद्र किनाऱ्याने वेढलेला आहे. या भागांत प्रवासाकरिता बोटीचा वापर होतो. मढ बेट ते वर्सोवा या मार्गावर थेट प्रवासाकरिता फेरीबोट हा एक चांगला पर्याय आहे. पण पावसाळ्यामुळे वर्षातील 4 महिने ही सेवा बंद असते. या उलट उड्डाणपुलामुळे मढ बेट ते वर्सोवा ही वाहतूक दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. उड्डाणपूल सुरू झाल्यावर मढ बेट ते वर्सोवा वेगाने पूर्ण करता येईल. उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांच्या तुलनेत उड्डाणपुलामुळे प्रवास कमालीचा वेगवान होईल. 

उड्डाणपूल झाल्यामुळे मढ बेट येथील रुग्णांना आवश्यकतेनुसार मुंबईतील मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेणे सोपे होणार आहे. तसेच मढ आणि वर्सोवा भागातील मच्छीमार बांधवाना मासे मुंबईत मोठ्या मार्केटमध्ये घेऊन जाणे किंवा थेट ससून डॉकमध्ये जाणे सोपे होणार आहे. 

Hydrogen Buses in India: भारतात चालणार हायड्रोजन बसेस, धुराऐवजी सोडणार पाणी

Mumbai : Central Railway Timetable : मध्य रेल्वे मार्गावरील या उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळांमध्ये बदल, बघा टाईमटेबल

उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या वेळेत 75 टक्के बचत होणार आहे. इंधन आणि मनुष्यबळ यातही मोठी बचत होणार आहे. प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी