Scholarship: भटक्या जाती, जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! नवीन 64 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 28, 2022 | 16:15 IST

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत (Other Backward Bahujan Welfare Department) नवीन 64 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (Vocational courses) शिष्यवृत्ती (Scholarship) सुरू करण्यात आल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री (Other backward, Bahujan Welfare Minister) विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली.

Scholarships for 64 new vocational courses
विद्यार्थ्यांनो, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आहे शिष्यवृत्ती  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यी परराज्यात शिक्षण घेत असला तरी मिळमार शिष्यवृ्त्ती
  • शिष्यवृत्तीसाठी नवीन 64 व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करा.
  • 2020-21 सालापासून 40 तर 2021-22 पासून 24 अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत (Other Backward Bahujan Welfare Department) नवीन 64 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (Vocational courses) शिष्यवृत्ती (Scholarship) सुरू करण्यात आल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री (Other backward, Bahujan Welfare Minister) विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली. मंत्री वडेट्टीवार म्हणाले, यामध्ये नवीन 64 व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर (MahaDBT system) मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 8 लाखापर्यंत मर्यादित आहे, ते विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असणार आहेत. याचबरोबर विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यात शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.

Read Also : बँंकांनी MCLR वाढवल्याने कर्जाच्या EMI वर कसा परिणाम होईल?

मागासवर्गीय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी संपूर्ण 605 अभ्यासक्रम होते आता एकूण 736 अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात 2020-21 सालापासून 40 तर 2021-22 पासून 24 अभ्यासक्रम नव्याने सुरू केल्याची माहिती यावेळी मंत्री वडेट्टीवार यांनी दिली.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी