School Teachers Salary: जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, आता सातच्या आत येणार पगार

मुंबई
भरत जाधव
Updated May 09, 2022 | 10:22 IST

खासगी अनुदानित शाळेतील (Zilla Parishad school) आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक (Teacher)-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे (Non-teaching staff) पगार (Salary) आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत मिळणार आहेत. वेळेवर पगार होत नसल्यामुळे अनेक शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

Good news for teachers, salaries will be within 7 date
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, 7 च्या आत होणार पगार   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आधीच्या प्रक्रियेला लागणाऱ्या कालावधीमुळे वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर प्रत्यक्ष जमा होण्यास विलंब होत होता.
  • शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत
  • थेट शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार रक्कम

मुंबई : खासगी अनुदानित शाळेतील (Zilla Parishad school) आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक (Teacher)-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे (Non-teaching staff) पगार (Salary) आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत मिळणार आहेत. वेळेवर पगार होत नसल्यामुळे अनेक शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु आता शिक्षकांचे पगार (Teachers Salary) जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (Zilla Parishad Fund Monitoring System, ZPFMS) प्रणालीद्वारे होणार असल्याने थेट शिक्षकांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. या आधीच्या प्रक्रियेला लागणाऱ्या कालावधीमुळे वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर प्रत्यक्ष जमा होण्यास विलंब होत होता. पण आता नव्या प्रणालीमुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचे पगार ‘झेडपीएफएमएस’ प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. खासगी अनुदानित शाळेतील आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याची वेतन देयके दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत वेतन पथकास सादर करण्याच्या सूचनाही मांढरे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना वेळेत पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read Also : Asani Cyclone: 'असानी' चक्रीवादळ पुढील 24 तासात तीव्र

राज्यातील शिक्षकांचे वेतन वेळेत होण्यासाठी वित्त विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मांढरे यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधिक्षक यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 

कसा होत होता शिक्षकांचा पगार 

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन देयक कोषागार कार्यालयातून मंजूर झाल्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा होते. त्यानंतर संबंधित रक्कम ही गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकाच्या संयुक्त खात्यावर जमा केली जाते आणि त्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा केले जाते.

Read Also : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांवर NIAची कारवाई

या प्रक्रियेला लागणाऱ्या कालावधीमुळे वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर प्रत्यक्ष जमा होण्यास विलंब होतो. हा विलंब ठाळण्यासाठी जालना जिल्हा परिषदेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून ‘झेडपीएफएमएस’ प्रणालीद्वारे शिक्षकांच्या खात्यावर थेट वेतनाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यात येते. त्यानुसार राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी देखील शिक्षकांचे वेतनी याच प्रणालीच्या धर्तीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून ‘झेडपीएफएमएस’ ऑनलाइन प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश मांढरे यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी