आनंदाची बातमी, पाऊस लवकर येतोय

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 13, 2022 | 08:25 IST

good news, rain is coming soon, Monsoon may reach Kerala early, onset over Andaman likely on May 15 : नैऋत्य मोसमी वारे आणि या वाऱ्यांसोबत येणारा पाऊस दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात १५ मे रोजी दाखल होईल.

Monsoon may reach Kerala early, onset over Andaman likely on May 15
आनंदाची बातमी, पाऊस लवकर येतोय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आनंदाची बातमी, पाऊस लवकर येतोय
  • नैऋत्य मोसमी वारे आणि या वाऱ्यांसोबत येणारा पाऊस दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात १५ मे रोजी दाखल होईल
  • एरवी पाऊस १८ ते २० मे या कालावधीत दाखल होतो

good news, rain is coming soon, Monsoon may reach Kerala early, onset over Andaman likely on May 15 : मुंबई : एक आनंदाची बातमी आहे. असनी हे चक्रीवादळ संपले आणि कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले. यामुळे नैऋत्य मोसमी वारे आणि या वाऱ्यांसोबत येणारा पाऊस दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात १५ मे रोजी दाखल होईल. दरवर्षी नैऋत्य मोसमी वारे आणि या वाऱ्यांसोबत येणारा पाऊस दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात १८ ते २० मे या कालावधीत दाखल होतो. यंदा पाऊस अंदमानात लवकर दाखल होत आहे; असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारपट्टीवर १२ मे रोजी अतिवृष्टी झाली. ऱ्यांचा वेग किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर होता. यामुळे नैऋत्य मोसमी वारे आणि या वाऱ्यांसोबत येणाऱ्या पावसाचा प्रवास सोपा झाला. 

तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ, लक्षद्वीप, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा येथे पुढील पाच दिवस पाऊस पडेल; असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, महाराष्ट्रातील विदर्भ या भागांमध्ये उष्णतेची तीव्रता १६ मे पर्यंत राहील. 

नैऋत्य मोसमी वारे आणि या वाऱ्यांसोबत येणारा पाऊस केरळमध्ये २० ते २६ दरम्यान तर तळकोकणात २७ मे ते २ जून दरम्यान दाखल होईल; असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील काही दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहील; असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी