Mumbai Crime : गोवंडीत लहान मुलांना विषप्रयोग करून दाम्पत्याची आत्महत्या

गोवंडीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने आपल्या मुलांना विषप्रयोग करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तसेच चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 

थोडं पण कामाचं
  • गोवंडीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • एका दाम्पत्याने आपल्या मुलांना विषप्रयोग करून आत्महत्या केली आहे.
  • या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

Mumbai Crime :गोवंडीत (Govandi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने आपल्या मुलांना विषप्रयोग करून आत्महत्या (Suicide) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तसेच चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी (postmortem) पाठवले आहेत. 

अधिक वाचा : Sanjay Raut : महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या, संजय राऊत यांची धक्कादायक ऑडिओ टेप?

मिळालेल्या माहितीनुसार गोवंडीतील शिवाजीनगर भागात इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एकाच घरात चार जणांचे मृतदेह आढळले. त्यात शकील जलील खान, त्याची पत्नी रझिया खान ७ वर्षाचा मुलगा सरफराज आणि ३ वर्षांची मुअल्गी आतिफा यांचा समावेश आहे. शकील खान आणि रझिया खान हे मूळचे उत्तर प्रदेशचे होते. दोघांनी २०१४ साली लग्न केले होते आणि त्यांना दोन मुलेही झाली. तीन चार वर्षांपूर्वी ते गोवंडीत रहायला आले होते. शकील हा गोवंडीतच किराणा मालाचे दुकान चालवत होता. शुक्रवारी सकाळपासून शकीलचा भाऊ सुफियन त्याला फोन करत होता. परंतु शकील फोनच उचलत नव्हता. म्हणून सुफियनने शकीलच्या घरी धाव घेतली. जेव्हा सुफियनने शकीलच्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शकीलसह चार जणांचा मृतदेह घरात पडला होता. त्याने तत्काळ पोलिसांना फोन करून याबद्दल माहिती दिली. 

अधिक वाचा : ठाकरेंच्या घरात भूकंप, काकांना सोडून पुतणे शिंदेंच्या तंबूत!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शकीलचे कुणासोबतही वाद नव्हते. त्यांची आर्थिक परिस्थितीही बरी होती. शकील आणि त्याच्या पत्नीने हे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही. पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान चौघांचे मृतदेह रुग्णालयात दाखल केले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 

अधिक वाचा : Corona च्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात, दिल्ली-गुजरात-बंगालचा ट्रेंड घाबरवणारा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी