Government Job : मराठी तरुणांनो राज्य सरकारमध्ये लवकरच मोठी भरती, पुढील १५ दिवसांत मुलाखत प्रक्रियाही पार पडणार

राज्य सरकार लवकरच पदभरती करणार आहे, त्यामुळ राज्यात नवीन नोकरभरती होणार आहे. राज्यात क्रीडा अधिकार्‍यांची पदभरती होणार आहे. क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे.

government job
सरकारी नोकरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्य सरकार लवकरच पदभरती करणार आहे
  • त्यामुळे राज्यात नवीन नोकरभरती होणार आहे.
  • राज्यात क्रीडा अधिकार्‍यांची पदभरती होणार आहे.

Government Job : मुंबई : राज्य सरकार लवकरच पदभरती करणार आहे, त्यामुळे राज्यात नवीन नोकरभरती होणार आहे. राज्यात क्रीडा अधिकार्‍यांची पदभरती होणार आहे. क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. 

अधिक वाचा : Maharashtra Toll: माझ्या हातात सत्ता द्या, मी सगळे टोल बंद करुन टाकेन: राज ठाकरे

राज्यातील क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे १५ दिवसाच्या आत भरली जातील अशी माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर क्रीडा मंत्री महाजन यांनी उत्तर देताना ही माहिती दिली. क्रीडा मंत्री  महाजन  म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने २००३ च्या शासन निर्णयाद्वारे तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात ३८० तालुका क्रीडा संकुले मंजूर झाली आहेत. सद्यस्थितीत राज्यात १०० क्रीडा अधिकाऱ्यांची पदे मंजूर झाली आहेत, त्यापैकी फक्त २० टक्के पदे भरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन येत्या आठवड्यात नागरी सेवा मंडळाची तातडीने बैठक घेऊन ४४ पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १५ पदांची मुलाखत प्रक्रिया या महिनाअखेर पूर्ण होईल. अशी ६९ पदे उपलब्ध होणार असल्याचेही  महाजन यांनी नमूद केले.

अधिक वाचा :  जालन्यात पुन्हा जीएसटी विभागाच्या ४० गाड्यांचा ताफा दाखल, आता कोणाची वरात निघणार?

राज्यातील जुन्या आणि नवीन तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांना देण्यात येणाऱ्या निधीच्या तरतुदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे क्रीडा साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये क्रीडा धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सी एस आर’ च्या माध्यमातून  क्रीडा प्रकारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून घेण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा : Uddhav Thackeray in Vidhanbhavan : उद्धव ठाकरे पोहचले विधीमंडळात, राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा केली अचानक 'एन्ट्री'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी