सरकार राहणे, पडणे या गोष्टी आमच्यासाठी नवीन नाही; मध्यवर्ती निवडणुकांसाठी आम्ही तयार- भुजबळ

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 22, 2022 | 13:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देहूमध्ये (Dehu) संत तुकारामाच्या (Saint Tukaram) भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले. किती संख्याबळ आहे त्यावर आमची बैठक होणार आहे, आपण मध्यवर्ती निवडणुकांना घाबरत नसल्याची, प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थ पाहायला मिळत आहे.

We are ready for the Mid term elections - Bhujbal
मध्यवर्ती निवडणुकांसाठी आम्ही तयार- भुजबळ  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मध्यवर्ती निवडणुका लागल्या तरी आम्ही कायम तयार आहोत- भुजबळ
  • महाविकास आघाडी बरखास्तीच्या दिशेने- राऊतांचे ट्विट
  • संध्याकाळी पाच वाजता शिवसेना आमदार आणि खासदारांची देखील बैठक होणार- भुजबळ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देहूमध्ये (Dehu) संत तुकारामाच्या (Saint Tukaram) भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले. किती संख्याबळ आहे त्यावर आमची बैठक होणार आहे, आपण मध्यवर्ती निवडणुकांना घाबरत नसल्याची, प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थ पाहायला मिळत आहे. आज तिन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. त्यापूर्वी भुजबळ माध्यमांशी बोलत होते.

पुढे भुजबळ म्हणाले की, पुढे काय होते ते आपण बघू सरकार राहणे, पडणे या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाही. मध्यवर्ती निवडणुका लागल्या तरी आम्ही कायम तयार आहोत. मार्ग काढण्यासाठी शरद पवारांशी चर्चा करणार करू, संध्याकाळी पाच वाजता शिवसेना आमदार आणि खासदारांची देखील बैठक होणार आहे.. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत महाविकास आघाडी बरखास्तीच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, बंडखोर एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अद्याप राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही गुवाहाटीत 42 पेक्षा जास्त आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला नाही, फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची भूमिका पुढे घेऊ जात आहोत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी