मोदींसमोर औरंगाबादचा विषय काढून राज्यपाल कोश्यारींनी सुरू केला नवा वाद

Koshiyari on Aurangabad water crises । ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हणत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत  औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवण्याची विनंती थेट पंतप्रधानांना केली. राज्यापालांच्या या कृतीवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचे म्हटले आहे. 

Governor Koshyari started a new controversy by raising the issue of Aurangabad before Modi
मोदींसमोर औरंगाबादचा विषय काढून राज्यपालांनी सुरू केला वाद 
थोडं पण कामाचं
  • ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हणत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत  औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवण्याची विनंती थेट पंतप्रधानांना केली.
  • राज्यापालांच्या या कृतीवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.
  • हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचे म्हटले आहे. 

औरंगाबाद : औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या राजकीय वादावादी सुरु असतानाच आता थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात  औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर चिंता व्यक्त करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हणत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत  औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवण्याची विनंती थेट पंतप्रधानांना केली. राज्यापालांच्या या कृतीवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचे म्हटले आहे.  (Governor Koshyari started a new controversy by raising the issue of Aurangabad before Modi )

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या पाणी प्रश्नाभोवती शहराचे राजकारण फिरत आहे.  जलवाहिनी, नवीन जलवाहिनी आदी मुद्द्यांवरून सातत्याने चर्चा होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद शहरात  नळाला आठ दिवसाआड पाणी येत आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील पाणीपट्टी ४०५० रुपयांवरून दोन हजार रुपयांवर आणण्याची घोषणा केली होती. तर पाणीप्रश्नावर संतापलेल्या भारतीय जनता पक्षाने मागील महिन्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलआक्रोश मोर्चा काढला होता. तर ८ जूनला मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या महासभेत पाणीप्रश्न  सांगत पाण्याच्या योजनांमध्ये आडकाठी करणाऱ्यांना झारीतील शुक्राचार्यांना थेट तुरुंगाची हवा खाऊ घाला असे आदेश दिल्याचे सांगितले होते. 

त्यानंतर गेल्या आठ-दहा दिवसांत पाण्याच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी विषय छेडला नव्हता. मात्र, आज राज्यपालांनी राजभवनातील कार्यक्रमात या विषयाला थेट पंतप्रधानांच्या पुढ्यात मांडल्याने त्याला राजकीय वळण लागले आहे. 

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना समर्पित ‘क्रांती गाथा’ या भूमिगत दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नाचा विषय छेडला. ते म्हणाले, औरंगाबादमध्ये नळाला सहा-आठ दिवसाआड पाणी येते, हे ऐकून चांगले वाटत नाही. मला अनेकांनी येऊन याबाबत माहिती दिली. पण आता औरंगाबादचा पाणी प्रश्न मिटायलाच हवा. अर्थात, मोदी है तो मुमकिन है, असे नेहमी म्हटले जाते. त्यामुळे येथील पाण्याच्या योजना मार्गी लागतील, असा मला विश्वास वाटतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी