Bhagatsingh Koshyari : मला जाऊ द्या ना घरी; राज्यपाल कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 23, 2023 | 18:21 IST

Maharashtra Governor Koshyari want resign: राज्यपाल यांनी माघारी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा पंतप्रधान मोदींकडे (Prime Minister Modi) केली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्याची राज्यपाल म्हणालेत.

Governor Koshyari's want resign from post
राज्यपाल कोश्यारी यांना आता नको जबाबदारीचा भार   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाविकासआघाडी सरकार आल्यापासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत संघर्ष पाहायला मिळाला.
  • राज्यपालांकडून महाराष्ट्रातील महापुरूषांचा अपमान करून झाला आहे.- मटकरी
  • महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? सचिन सावंत

Maharashtra Governor Koshyari want resign:  मुंबई  :  राज्याचे राज्यपाल (Governor)भगतसिंग कोश्यारी (Bhagatsinh Koshyari)यांना जबाबदारीचं ओझं आता जास्त वेळ वाहू वाटत नसल्याने ते राजीनामा (resignation)देणार असल्याची माहिती हाती आली आहे.  राज्यपाल यांनी माघारी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा पंतप्रधान मोदींकडे (Prime Minister Modi) केली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्याची राज्यपाल म्हणालेत.   (Governor Koshyari's want resign from post)

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत राज्यपाल यांनी आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. राजभवनने याबाबतचं प्रसिद्धीपत्रक दिलं आहे.

अधिक वाचा  : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 'हे' विचार मनात जागवतात क्रांती

काय आहे प्रसिद्धीपत्रकात 

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,' असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यापासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत संघर्ष पाहायला मिळाला.आता राज्यपाल यांच्या राजीनाम्याच्या या संकेतामुळे विरोधी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. 

अधिक वाचा  :कधी आहे माघी गणेश जयंती? माघी गणेश जयंती का साजरी करतात?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत काँग्रेसची भूमिका आधीपासूनच स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. "सातत्याने महापुरूषांचा आणि संविधानिक व्यवस्थेचा अपमान करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली होती. राज्यपाल भवन हे भाजप भवन झालं होतं असं चित्र दिसत होतं. राष्ट्रपतींकडे देखील आम्ही लेखी तक्रारी केल्या होत्या. परंतु, भाजपलाच त्यांची भूमिका अपेक्षित होती की काय असं वाटतंय. कारण अनेकवेळा लेखी मागणी करून देखील त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. राज्यपाल हे उद्या जाण्याऐवजी आजच जावेत अशी आमची मागणी आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  :कार्तिकने केले 10 दिवसांचे सर्वात महागडे शूट

सचिन सावंत 

तर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. "राज्यपालांनी थोर महापुरुषांचा सातत्याने केलेल्या अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजप नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही. 

याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार आणि भाजपाची भावना दिसते. महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? जाहीर निषेध!," असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे. 

अमोल मिटकरी 

  "राज्यपालांकडून महाराष्ट्रातील महापुरूषांचा अपमान करून झाला आहे. त्यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील जनतेची त्यांना हटवण्यात यावे अशी मागणी होती. ते जेवढ्या लवकर राज्यातून जातील तेवढ्या लवकर महाराष्ट्र सुटकेचा नि:श्वास सोडेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी