बालगोपाळांच्या ‘कट्टी – बट्टी’ने राज्यपाल प्रभावित

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 14, 2021 | 17:56 IST

Governor presents Gandhar Gaurav to Atul Parchure and Usha Nadkarni is honoured with Jeevan Gaurav बालदिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार २०२१ आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना 'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान

Governor presents Gandhar Gaurav to Atul Parchure and Usha Nadkarni is honoured with Jeevan Gaurav
बालगोपाळांच्या ‘कट्टी – बट्टी’ने राज्यपाल प्रभावित 
थोडं पण कामाचं
  • बालगोपाळांच्या ‘कट्टी – बट्टी’ने राज्यपाल प्रभावित
  • अभिनेते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार २०२१
  • ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना 'जीवन गौरव' 

Governor presents Gandhar Gaurav to Atul Parchure and Usha Nadkarni is honoured with Jeevan Gaurav । मुंबईः सरकारे येतात आणि जातात. परंतु लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंब, समाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होते, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या 'गंधार' कला संस्थेतर्फे  लहान मुलांच्या 'कट्टी बट्टी' या कार्यक्रमाचे  तसेच 'गंधार गौरव' पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे रविवारी (१४ नोव्हेंबर २०२१)  आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.    

बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार संजय केळकर,  ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की  व गंधारचे अध्यक्ष मंदार टिल्लू व्यासपीठावर उपस्थित होते.

संगीत, कला, नाट्य या गोष्टींचा ज्याला गंध नाही अश्या व्यक्तीला विना शेपटीचा पशु संबोधले जाते, या अर्थाच्या सुभाषिताचा उल्लेख करून संगीत व नाट्यात दुःख विसरायला लावण्याची ताकत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

'कट्टी बट्टी' या कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केलेल्या बालभारती पुस्तकातील बडबडगीतांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली व बालनाट्य चमूला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

बालप्रेक्षक हा महत्वाचा प्रेक्षक आहे व त्याच्या पुढे सादरीकरण करणे आव्हानात्मक काम असते. कोरोनाचे निर्बंध संपल्यावर आपण पुन्हा बालनाट्य घेऊन रसिकांपुढे येऊ, असे अतुल परचुरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. 

राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक जयंत पवार, निवेदिका अनुश्री फडणीस, संगीतकार ओंकार घैसास व प्रकाश पारखी यांना गंधार युवा गौरव पुरस्कार देण्यात आले.

गंधार ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून कार्य करीत असून संस्थेने १०० च्या वर बालनाट्य सादर करून त्याचे हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी