Maharashtraachi Girishikhare : उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे 'महाराष्ट्राची गिरिशिखरे' पुरस्काराने सन्मानित

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 27, 2021 | 01:05 IST

Governor presents ‘Maharashtraachi Girishikhare’ Awards to eminent personalities : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४४ व्यक्तींना  'महाराष्ट्राची गिरिशिखरे' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Governor presents ‘Maharashtraachi Girishikhare’ Awards to eminent personalities
उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडींचा राज्यपांच्या हस्ते गौरव  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे 'महाराष्ट्राची गिरिशिखरे' पुरस्काराने सन्मानित
  • राज्यपांच्या हस्ते गौरव
  • मुंबईत रंगशारदा सभागृह येथे झाला कार्यक्रम

Governor presents ‘Maharashtraachi Girishikhare’ Awards to eminent personalities : मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४४ व्यक्तींना  'महाराष्ट्राची गिरिशिखरे' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पीपल्स आर्ट सेंटर या संस्थेतर्फे रंगशारदा सभागृह येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे, आशा खाडिलकर  यांसह कृषी, उद्योग, कला, क्रीडा व इतर क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

नागपूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ उदय माहूरकर, बीव्हीजी कंपनीचे हनुमंतराव गायकवाड, तबला वादक माधव पवार, बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे (भाग्यश्री ठिपसे),  शिल्पकार भगवान रामपुरे, चित्रकार प्रभाकर कोलते, वास्तूविशारद शशी प्रभू, पर्यावरण कार्यकर्ते किशोर रिठे, दीपक शिकारपूर, आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.   

कलाकार, उद्योजक, खेळाडू, शेतकरी, व्यावसायिक, श्रमिक व सृजनात्मक कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींमुळेच देश मोठा होत असतो. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपापल्या क्षेत्रात प्रत्येकाने अधिकतम योगदान दिले पाहिजे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याप्रसंगी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी