घाईघाईने काढलेल्या जीआरच्या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे, दरेकरांची मागणी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 24, 2022 | 15:27 IST

Governor should pay attention to the hastily drawn GR case, Pravin Darekar demanded : सरकार अस्थिर झाल्यानंतरची जीआर काढण्याची गती संशयास्पद वाटत आहे. यामुळे या प्रकरणात स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालावे अशा स्वरुपाची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Governor should pay attention to the hastily drawn GR case, Pravin Darekar demanded
घाईघाईने काढलेल्या जीआरच्या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे, दरेकरांची मागणी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • घाईघाईने काढलेल्या जीआरच्या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे
  • प्रविण दरेकरांची मागणी
  • दरेकरांनी राज्यपालांकडे पत्र पाठवून केली मागणी

Governor should pay attention to the hastily drawn GR case, Pravin Darekar demanded : मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्यानंतर ४८ तासांत १६० पेक्षा जास्त शासन निर्णय (शासन आदेश) अर्थात जीआर निघाले आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एवढा वेगवान कारभार झाल्याचे दिसत आहे. सरकार अस्थिर झाल्यानंतरची ही जीआर काढण्याची गती संशयास्पद वाटत आहे. यामुळे या प्रकरणात स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालावे अशा स्वरुपाची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारवर खंडणी वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. सरकारी पातळीवरून होणाऱ्या बदल्या आणि बढत्यांवरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री अशाच स्वरुपाच्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. 

अडीच  वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास आघाडी सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. आता घाईघाईने पोलीस दलात बदल्या करण्याचाही घाट घातला जात आहे. हा प्रकार संशयास्पद वाटत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी तसेच विकासाकरिताच्या निधीचा गैरवापर थांबविण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा; अशी मागणी दरेकर यांनी केली.

प्रविण दरेकर यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे....

मुंबई, दि. 24 जून 2022
प्रति, 
मा. भगतसिंग कोश्यारीजी
महामहीम राज्यपाल, महाराष्ट्र

विषय : राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत
महोदय,
कोरोनाच्या संसर्गातून आता आपली प्रकृती सुधारत असेलच. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो.
एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वत: राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे. 
अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासनआदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापूर्वी पोलिस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे.
महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे.

प्रवीण दरेकर
विरोधी पक्षनेता, विधानपरिषद

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी