Grandparent day celebration in Maharashtra schools: राज्यातील सर्व शाळांमध्ये आता आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने एक जीआर सुद्धा काढला आहे. सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात. खरे पाहता आजी आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. आजी आजोबा पहिले मित्रच असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्वपूर्ण असून हे नातं पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी आहे.
शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्यांच्या जडण घडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करणे यासाठी "आजी आजोबा" दिवस शाळेत साजरा करणे संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
हे पण वाचा : मिरची दिसायला आहे लाल पण आरोग्याला देते अनेक लाभ
मुलांना शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी "आजी आजोबा" दिवस साजरा होणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी "आजी आजोबा दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने या वर्षी 10 सप्टेंबर, 2023 रोजी "आजी आजोबा" दिवस असून त्याअनुषंगाने त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी हा उपक्रम राबवून राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
हे पण वाचा : तिळाचे तेल लयभारी, त्वचेच्या समस्या दूर करण्यास गुणकारी
"आजी आजोबा" दिवस हा उपक्रम राबवून राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून "आजी आजोबा" दिवस साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी "आजी आजोबा" दिवस साजरा केला जातो. त्यानुसार हा दिवस त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी शाळांमध्ये "आजी आजोबा" दिवस म्हणून साजरा करण्यात यावा व या दिवशी शासकीय सुट्टी आल्यास त्याच्या पुढच्या कार्यालयीन दिवशी ह्या दिवसाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. तथापि या प्रस्तावित दिवशी सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेकडून न करता आल्यास शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस "आजी आजोबा" दिवस म्हणून साजरा करावा व यानिमित्ताने राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर खालील विविध कार्यक्रम साजरे करण्यात यावेत.
हे पण वाचा : प्रेग्नेंसीत चिंता का वाढते?
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.