आताची मोठी बातमी, मुंबईतील या वर्गाच्या ऑफलाइन शाळा बंद

Mumbai 1 to 11 class School open online : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकेने इ. १० आणि १२ वी चे वर्ग वगळता सर्व वर्गांच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा ऑफलाइन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

Greater Mumbai Municipal Corporation area and keeping them open online not off line
मुंबईतील या वर्गाच्या ऑफलाइन शाळा बंद 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकेने इ. १० आणि १२ वी चे वर्ग वगळता सर्व वर्गांच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा ऑफलाइन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
  • शाळा ऑनलाइन सुरू राहणार आहेत. 
  • ओमीकोन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये

मुंबई :  मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकेने इ. १० आणि १२ वी चे वर्ग वगळता सर्व वर्गांच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा ऑफलाइन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळा ऑनलाइन सुरू राहणार आहेत. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने एक पत्रक काढून सर्व खासगी आणि सर्व माध्यमांच्या शाळा प्रशासनांना पत्र पाठविले आहे.  (Greater Mumbai Municipal Corporation area and keeping them open online not off line )


 सद्यस्थितीत जगातील काही देशामध्ये आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात

ओमीकोन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमायक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. 1 ली ते इ.9 वी व 11 वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ते दि. 31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत. 
 
 प्रत्यक्ष उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरु राहणार आहे

विद्यार्थ्याचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार याकरीता महापालिका शाळांसह खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणा-या 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करुन घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी