GSB Ganpati Mandal insurance : मुंबई : मुंबईच्या जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यंदा ३१६ कोटी रुपयांचा विमा काढला आहे. या विम्यामध्ये दागदागिने, इतर वस्तू आणि कर्मचार्यांचा विमा उतरवण्यात आला आहे. इतकेच नाही तर दर्शनासाठी येणार्या भक्तांचाही त्या विम्याचा फायदा होणार आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाज जीएसबी मंडळाच्या माध्यामातून गणेशोत्सव साजर करतात. हे गणपती मंडळ मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. (gsb ganesh mandal records 316 crore insurance cover mumbai ganesh festival)
मिळालेल्या माहितीनुसार जीएसबी मंडळाने न्यु इंडिया इन्श्युरसन कंपनीकडून विमा घेतला आहे. हा विमा तब्बल ३१६ कोटी रुपयांचा आहे. त्यातील ३१.९७ कोटी रुपयांचा विमा हा गणपतीच्या सोने, चांदीच्या दागिन्यांचा आहे. तसेच मंडळातील कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवकांचा २६३ कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरवण्यात आला आहे.
जीएसबी मंडळाने फर्नीचर, कॉम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरे इतकेच नाही तर फळ आणि भाज्यांचा भूकंपासाठी रिस्क कवरसोबत एक कोटींचा स्टॅण्डर्ड फायर आणि स्पेशल पेरिल पॉलीसीही घेतली आहे. मंडपाच्या परिसरासाठी स्टॅण्डर्ड फायर आणि स्पेशल पेरिल पॉलिसीमध्ये ७७.५ लाख रुपयांचा विमा मिळतो. तसेच सार्वजनिक उत्तरदायित्व त्यात मंडम, स्टेडियम आणि आलेल्या भक्तांचाही २० कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. जीएसबी मंडळाच्या गणपतीला ६६ किलोचे सोन्याचे तर २९५ किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवले जाते. यापूर्वी २०१६ साली जीसबी गणेशोत्सव मंडळाने ३०० कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. आता २९ ऑगस्टला विराट दर्शनातून जीएसबी गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे पहिले दर्शन होणार आहे.
Mumbai's wealthiest GSB King's Circle Ganesh mandal takes record insurance of Rs 316.40 crore https://t.co/0LNwtwDCh6 — TOI Mumbai (@TOIMumbai) August 22, 2022
अधिक वाचा : Solapur Rain : 'या' कारणामुळे ४० कुटुंबियांना घर सोडून जाण्याची वेळ
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.