हाफकिनमध्ये होणार कोवॅक्सिनची निर्मिती

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 16, 2021 | 02:35 IST

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली.

Haffkine Institute gets nod to produce Covaxin
हाफकिनमध्ये होणार कोवॅक्सिनची निर्मिती 

थोडं पण कामाचं

  • हाफकिनमध्ये होणार कोवॅक्सिनची निर्मिती
  • केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने दिली मान्यता
  • वर्षभरात प्रकल्प सुरू होण्याची शक्यता

मुंबईः हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. Haffkine Institute gets nod to produce Covaxin

कोरोनापासून बचावाचा उपाय, इम्युनिटीसाठी सोप्या टिप्स

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता देण्यात आली आहे. कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे तसेच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी. प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितले.

'ही' लक्षणे दिसल्यास कोरोना रुग्णाने हॉस्पिटलमध्ये जावे!

याआधी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या मागणीची नोंद पंतप्रधान मोदी यांनी घेतली. यानंतर पंतप्रधानांच्या आदेशानुसार एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. या समितीने हाफकिन संस्थेला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी परवानगी देता येईल का आणि त्यात काही कायदेशीर अडचणी असल्यास त्या कशा सोडवता येतील याबाबत अहवाल दिला. या अहवालाआधारे हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी