Haji Arafat Sheikh vs Nawab Malik : माझ्याकडे बॉम्ब नाही, पण सर्व प्रकरणे बाहेर काढणार; मलिकांच्या आरोपांमधील हाजी अराफत शेख यांची आज पत्रकार परिषद

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 11, 2021 | 08:53 IST

Mumbai Cruise Drugs Case : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) यांच्या वादात आता भाजप नेते हाजी अराफत शेख (BJP leader Haji Arafat Sheikh) यांची  एन्ट्री झाली आहे.

Haji Arafat Sheikh will hold a press conference today on Malik's allegations
मलिकांच्या आरोपांमधील हाजी अराफत शेख यांची आज पत्रकार परिषद  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी गुंडांना मोठ्या पदावर बसवलं - मलिकांचा आरोप
  • खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते.
  • फडणवीस यांनी हाजी अराफत यांच्या धाकट्या भावाला वाचवण्यासाठी आणि बनावट नोटांच्या रॅकेटला संरक्षण देण्याचे काम केले.

Mumbai Cruise Drugs Case : मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज केस (Cruise Drugs Case) प्रकरणावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला झाला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) यांच्या वादात आता भाजप नेते हाजी अराफत शेख (BJP leader Haji Arafat Sheikh) यांची  एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्रतील भाजप नेते हाजी अराफत शेख आज पत्रकार (Press conference) घेऊन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांचे उत्तर देणार आहेत.

काल नवाब मलिकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. सोबतच फडणवीसांच्या आशीर्वादाने  बनावट नोटांचा खेळ सुरू होता. आरोप करताना मलिक म्हणाले की, खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते. खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनी केलं. या खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेख हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करुन अल्पसंख्याक कमिशनचा अध्यक्ष आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाजी अराफत यांच्या धाकट्या भावाला वाचवण्यासाठी आणि बनावट नोटांच्या रॅकेटला संरक्षण देण्याचे काम केले, असं मलिक म्हणाले. मलिकांच्या याच आरोपांना आज हाजी अरफात शेख उत्तर देणार आहे.

नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यावर भाजप नेते हाजी अराफत यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. हाजी अराफत शेख यांनी सांगितले की, नवाब मलिक यांनी फिल्म सुरू केली आहे, पण आम्ही ती पूर्ण करू. तर नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, त्यांना तातडीने मानसिक उपचारांची गरज असल्याचे हाजी अराफत शेख यांनी सांगितले. नवाब मलिकसोबत माझा भाऊ इम्रान शेख याचा फोटो असल्याचे अराफत यांनी सांगितले. ते त्याच्या लग्नात सामील आहेत. मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केक कापलाय. ही सर्व चित्रे आहेत. माझ्याकडे बॉम्ब नाही पण नवाब मलिकांची छोटी-मोठी सर्व प्रकरणे मी उघडकीस आणणार असं हाजी अराफत शेख यांनी सांगितले.

कोण आहेत हाजी अराफत शेख?

  • हाजी आरफत शेख हे विद्यार्थी सेना आणि भारतीय विद्यार्थी  सेनेत सक्रीय होते.
  • मनसेचे उपाध्यक्ष आणि वाहतूक विभागाचे प्रमुख  देखील झाले. 
  • 2014 मध्ये शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश केला आणि सेनेचे उपसभापती बनले. 
  • महाराष्ट्र शिव वाहतूक सेनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 
  • 2018 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी