Happy Holi 2021: होळीच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि WhatsApp मेसेज

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 27, 2021 | 20:33 IST

Happy Holi 2021 wishes WhatsApp Marathi messages: होळीच्या शुभेच्छा देणारे आणि सोशल मीडियात व्हायरल होणारे काही खास मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Happy Holi 2021 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
होळीच्या शुभेच्छा देणारे मेसेज  |  फोटो सौजन्य: Instagram

Happy Holi 2021 whatsapp Marathi wishes and messages: होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी २८ मार्च २०२१ रोजी होळी हा सण आहे. मात्र, यंदा राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने होळी हा सण साधेपणाने आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शिमगा अर्थात होळी सणाच्या निमित्ताने कोकणात पालखीची मिरवणूक सुद्धआ काढण्यात येते. मात्र, यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल अशा उपाययोजना कऱण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Happy Holi 2021 wishes images quotes photos greeting message WhatsApp and Facebook status in Marathi)

इतर सणांप्रमाणे यंदा होळी या सणावरही कोरोनाचे सावट असले तरी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा नक्कीच देऊ शकतात. होळीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. असेच सोशल मीडियात व्हायरल होणारे होळीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

होळीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Happy Holi 2021 Marathi messages)

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा,

आळस आणि वाईट विचारांचे दहन होवो

सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो

सर्वांना होळीच्या शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Instagram)

वाईट सारे जळून जावे, 

चांगले ते उदयास यावे

दृष्ट प्रवृत्तींचा होवो नाश, 

सर्वांना लाभो सुख: शांती आज

सर्वांना होळीच्या शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Instagram)

अनिष्ट प्रथा आणि वाईट प्रवृत्तीवर 

चांगुलपणाने मात करण्याचा दिवस

आपल्या सर्व वाईट विचारांची होळी करू या, 

दुष्टावर मात करु या...! 

आपणास होळीच्या शुभेच्छा !

(फोटो सौजन्य: Instagram)

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू 

प्रेम, शांती, आनंद, 

चहुकडे पसरवू 

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये 

नकारात्मकता दहन करू 

होळीच्या सर्वांना शुभेच्छा !

(फोटो सौजन्य: Instagram)

चला पेटवूया होळी

दाखवून नैवेद्य पुरणपोळी 

होळी रे होळी, पुरणाची पोळी 

होळीच्या सर्वांना शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Instagram)

फाल्गुन मासी येते होळी 

खायला मिळते पुरणाची पोळी 

रात्री देतात जोरात आरोळी

राख लावतो आपुल्या कपाळी 

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

होळी पेटू दे 

द्वेष जळू दे 

अवघ्या जीवनात 

नवे रंग भरू दे 

होळीच्या सर्वांना शुभेच्छा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी