Happy Rang Panchami 2021: रंगपंचमीच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि WhatsApp मेसेज

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 28, 2021 | 22:29 IST

Happy Rang Panchami Dhulivandan 2021 wishes WhatsApp Marathi messages: रंगपंचमीच्या शुभेच्छा देणारे आणि सोशल मीडियात व्हायरल होणारे काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Happy Rang Panchami Dhulivandan 2021 whatsapp Marathi wishes and messages
रंगपंचमीच्या शुभेच्छा   |  फोटो सौजन्य: BCCL

Happy Rang Panchami Dhulivandan 2021 Whatsapp Marathi wishes and messages: रंगांचा उत्सव अर्थात रंगपंचमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी (Rang Panchami) साजरी करण्यात येते तर ग्रामीण भागात होळीच्या पाच दिवसांनंतर धुलीवंदन (Dhulivandan) / रंगपंचमी साजरी करण्यात येते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. रंगांचा हा सण साजरा करताना दरवर्षी एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे धुलिवंदन आणि रंगपंचमी साधेपणाने साजरे करावे असे आवाहन ही राज्य शासनाने केले आहे. (Happy Rang Panchami 2021 wishes images quotes photos greeting message WhatsApp and Facebook status in Marathi)

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने एकत्र येऊन रंगपंचमी साजरी करता येणार नसल्याने नाराज होण्याची आवश्यकता नाहीये कारण, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा तर नक्कीच देऊ शकतात. रंगपंचमीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. असेच सोशल मीडियात व्हायरल होणारे धुलीवंदन, धुळवड आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

रंगपंचमीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Rang Panchami 2021 Marathi messages)

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, 

रंग नात्यांचा, रंग बंधाचा, 

रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

धुळवडीच्या रंगांप्रमाणे 

तुमचं आयुष्य ही

विविध रंगांनी रंगून जावो

धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा

पिचकारीतील पाणी, अन् रंगांची गाणी...

रंगपंचमीच्या सणाची, अनोखी कहाणी...

रंगांनी रंगलेल्या रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

उधळूया रंग आनंदाचे...

जपूया रंग माणुसकीचे...

धुलिवंदन व रंगपंचमीच्या 

सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 

रंगपंचमीचे रंग जणू, 

एकमेकांच्या रंगात रंगतात...

असूनही वेगळे रंगांनी, 

रंग स्वत:चा विसरुनी...

एकीचे महत्व सांगतात 

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 

साथ रंगांची, उधळण आनंदाची...

धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी