'Har Ghar Tiranga' Abhiyan: उद्धव ठाकरेंनी घराविषयी केलेल्या प्रश्नाला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर; काढला माजी मुख्यमंत्र्यांचा अभ्यास

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 14, 2022 | 06:43 IST

भारताला (India) स्वातंत्र्य (Freedom) मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून (Central government) कालपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे.

BJP's response to Uddhav Thackeray's question
उद्धव ठाकरेंच्या त्या प्रश्नाला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाची घोषणा केली होती.
  • माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'हर घर तिरंगा' या अभिमायानाबाबत एक ट्विट करत प्रश्न विचारला

मुंबई : भारताला (India) स्वातंत्र्य (Freedom) मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून (Central government) कालपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. मात्र अभियानावरुन विरोधक केंद्राला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींनंतर माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत या अभियानावरुन टीका केली. याला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाची घोषणा केली होती. यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधात्मक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? अशी विरोधात्मक प्रतिक्रिया दिली. त्यावर भारतीय जनता पार्टीकडूनही याला सणसणीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

Read Also : टीम इंडिया झिम्बाब्वेला रवाना होताना धवनने सोफ्यावर झोपला

माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'हर घर तिरंगा' या अभिमायानाबाबत एक ट्विट करत प्रश्न विचारला आहे, "मायबाप सरकारने कार्यक्रम दिला आहे, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. घराचा नाही पत्ता... ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे?" असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलंय. 

भाजपचं उत्तर 

 600 कुटुंबियांना बेघर करणाऱ्याला पाठीशी घालणारे असे प्रश्न करू नये. - भाजपा

भाजपाने ट्विट करत म्हटलंय. 4 व्यक्तींना राहण्यासाठी 2 बंगल्यांची गरज लागते का? त्यातील एखादी खोली देण्याची तयारी दाखवणार का? 600 कुटुंबियांना बेघर करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्यांनी असे प्रश्न करू नये. मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, अभ्यास केला असता तर 9 लाख घरे महाराष्ट्रात दिली आहेत केंद्राने हे देखील समजलं असतं.

Read Also : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

'हर घर तिरंगा' अभियान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाची घोषणा केली होती. यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी