मराठी अभिनेत्रीशी लग्नासाठी फसवणूक करणाऱ्या माजी नगरसेवकाला हायकोर्टाचा दणका

मुंबई
Updated Jul 29, 2022 | 13:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai High court: फसवणूक केलेल्या माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठियाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने मराठी अभिनेत्रीशी लग्न करण्यासाठी तिला फसवणूक केले होते. 

bombay high court
मराठी अभिनेत्रीला फसवणाऱ्या माजी नगरसेवकाला हायकोर्टाचा दणका 
थोडं पण कामाचं
  • आरोपी सिद्धार्थ बांठियाने २०१०मध्ये वर्सोवा येथे मराठी अभिनेत्रीशी लग्न केले होते. 
  • याआधी दोन वर्षांपूर्वी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती.
  • २०१३मध्ये या अभिनेत्रीने बांठियाविरोधात पुण्यातील दत्तावाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

मुंबई: मुंबई हायकोर्टाने(bombay high court) मंगळवारी माजी नगरसेवकाला(former corporator) मराठी अभिनेत्रीची(marathi actor) फसवणूक केल्याप्रकरणी दणका दिला. त्याने बॅचलर असल्याचे सांगत मराठी अभिनेत्रीची फसवणूक केली होती. यावेळेस अभिनेत्रीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सिद्धार्थ बांठियाने २०१०मध्ये वर्सोवा येथे मराठी अभिनेत्रीशी लग्न केले होते. (HC not give relie to siddharth banthia in rape case of marathi actor)

अधिक वाचा - कुत्रा घरी आणणं मुलाला पडलं महागात

याआधी दोन वर्षांपूर्वी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती. मात्र मराठी अभिनेत्रीशी लग्न केल्याच्या दोन महिन्यांनतर बांठियाच्या पहिल्या पत्नीने मराठी अभिनेत्रीशी संपर्क साधला आणि सांगितले की बांठियाचे आधीच लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. जेव्हा मराठी अभिनेत्रीने बांठियाला याबाबत विचारले असता बांठियाने आपला तिच्यासोबत घटस्फोट झाल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर तिचा विश्वास बसावा यासाठी त्याने खोटी कागदपत्रेही दिली. मात्र ही कागदपत्रे खोटी असल्याचे काही कालावधीनंतर समोर आले. 

२०१३मध्ये या अभिनेत्रीने बांठियाविरोधात पुण्यातील दत्तावाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुणे सत्र न्यायालयाने बांठियाला दिलासा न दिल्याने बांठियाने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. इतकंच नव्हे तर बांठियाने हायकोर्टातही नवी कथा रचली. बांठियाने हायकोर्टात सांगितले की मराठी अभिनेत्रीशी केलेले लग्न आणि तसेच लग्नाचा वाढदिवस हे सगळं टीव्हीवरील कार्यक्रमाचा एक भाग होता. तसेच या मराठी अभिनेत्रीनं आपल्याला कार्यक्रमात पतीची भूमिका साकारण्यासाठी ऑफ दिली होती. 

अधिक वाचा - भारतात १० वर्षांत १०५९ वाघांचा मृत्यू, देशात उरले २९६७ वाघ

दरम्यान, हायकोर्टाने हा सारा युक्तिवाद खोटा ठरवला. त्यांनी या बोगस कथेवर विश्वास ठेवण्यास नकार दिला. न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठाने बांठिया याने दाखल केलेली ही याचिका फेटाळून लावली.  तसेच बांठियाला हायकोर्टाने कोणताही दिलासा दिलेला नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी