महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १० रुग्ण, लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 09, 2021 | 19:51 IST

10 cases of omicron in maharashtra, Health Minister Rajesh Tope makes big statement regarding lockdown महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची संख्या बुधवार ८ डिसेंबर २०२१ रोजी दहा झाली. या दहा जणांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या चाचण्या सुरू आहेत. महाराष्ट्र शासन कोरोना आणि ओमायक्रॉन यांच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

10 cases of omicron in maharashtra, Health Minister Rajesh Tope makes big statement regarding lockdown
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १० रुग्ण, लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १० रुग्ण, लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य
  • महाराष्ट्र शासन कोरोना आणि ओमायक्रॉन यांच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे
  • संसर्ग झपाट्याने पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू

10 cases of omicron in maharashtra, Health Minister Rajesh Tope makes big statement regarding lockdown मुंबईः महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची संख्या बुधवार ८ डिसेंबर २०२१ रोजी दहा झाली. या दहा जणांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या चाचण्या सुरू आहेत. देशात दीर्घकाळ सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात असे चित्र होते. आता ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराने बाधीत झालेल्या रुग्णांची राज्यातील संख्या झपाट्याने वाढू नये यासाठी शासन खबरदारी घेत आहे. 

कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणू तसेच कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या ओमायक्रॉन यांचा संसर्ग झपाट्याने पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, मास्क वापरावा, स्वतःच्या आणि परिसराच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी, हात सॅनिटायझरने स्वच्छ करावे; असे आवाहन महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने केले आहे.

महाराष्ट्र शासन कोरोना आणि ओमायक्रॉन यांच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अद्याप राज्य शासनाने लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. आवश्यकता भासली तर या संदर्भात विचार करू. मात्र सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू केलेला नाही; अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नागरिकांनी लसीकरण पूर्ण करुन घ्यावे तसेच कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे; असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी