अजित पवारांचा सवाल अन् तानाजी सावंत गडबडले... विधानसभेतील नेमका ड्रामा काय?

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 18, 2022 | 13:14 IST

Health Minister Tanaji Sawant: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे अजित पवारांनी विचारलेल्या प्रश्नावर परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की ओढावली आहे.

health minister tanaji sawant was unable to answer ajit pawars question what is exact drama in legislative assembly
अजित पवारांचा सवाल अन् तानाजी सावंत गडबडले...   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • पालघर जिल्ह्यातल्या हत्तीरोग प्रादुर्भाव नियंत्रणासंदर्भात अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर गडबडले तानाजी सावंत
  • शिंदे सरकारचे आरोग्यमंत्री उत्तर देण्यास ठरले असमर्थ
  • विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहिल्याच प्रश्नापुढे शिंदे सरकार निष्प्रभ

Ajit Pawar: मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना देता न आल्याने, शिंदे सरकारच्या (Shinde Govt) कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आता सरकारकडून सोमवारी दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (health minister tanaji sawant was unable to answer ajit pawars question what is exact drama in legislative assembly)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिंबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी हे सगळे प्रश्न विचारण्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विचारण्यात आले.

अधिक वाचा: 'मोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के'

पण या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री  तानाजी सावंत यांना देता आली नाही. याबाबतची सविस्तर माहितीच आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाही. त्यामुळे हा प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला. त्यामुळे शिंदे सरकारला विचारलेला पहिलाच प्रश्न राखून ठेवावा लागणे, ही नामुष्कीची गोष्ट आहे.

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या 80 बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील 29 बालकांना या रोगाची लागण झाली आहे. 

अधिक वाचा: "राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच देशमुख, मलिकांना भेटणार"

यासंदर्भात प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप व अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. याकडे लक्ष वेधून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. 

हत्तीरोग नियंत्रण यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, त्यापैकी भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंध उपाययोजनांसाठी पालघर जिल्ह्यासाठी मंजूर निधी व वर्षभरात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता आली नाहीत. त्यामुळे हा प्रश्न उत्तरासाठी सोमवापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

अधिक वाचा: हे नेते झोपत का नाहीत?

अजित पवार, दिलीप वळसे-पाटलांनी आरोग्यमंत्र्यांना घेरलं

पालघरसंबंधी आरोग्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसल्याचं लक्षात येताच विरोधी बाकावर बसलेले अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पूर्णपणे घेरलं. त्यामुळे हा प्रश्न आपण राखून ठेवत आहोत असं विधानसभा अध्यक्षांना सांगावं लागलं. 

या घटनेवरुन अधिवेशनात विरोधक सरकारची कशाप्रकारे कोंडी करु शकतात याची एक चुणूक दिसून आली.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी