Thackeray Vs Shinde: शिवसेनेचा वाघ कोण? सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी

मुंबई
उमेर सय्यद
Updated Aug 21, 2022 | 18:21 IST

Shiv Sena Party Case Supreme Court: राज्यातील सरकार वैध की अवैध, शिवसेना नेमकी कोणाची या सगळ्या गोष्टींबाबत उद्या पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

hearing will be held tomorrow in the supreme court on who exactly shiv sena party is
शिवसेनेचा वाघ कोण? सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
  • सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देणार?
  • उद्याच निकाल येणार की प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार?

Shiv Sena: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेशी (Shiv Sena) बंड करून महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता स्थापना केली खरी मात्र ठाकरे आणि शिंदेंमधला खरा शिवसेनेचा वाघ कोण? याबाबत उद्या (२२ ऑगस्ट) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.  (hearing will be held tomorrow in the supreme court on who exactly shiv sena party is)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदाराच्या गटाने बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे Vs एकनाथ शिंदेची ही लढाई सर्वोच्च न्यायालयापुढे गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात एकूण ५ याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, दाखल सर्व याचिकेवर न्यायालय हे प्रकरण घटना पीठाकडे सोपवणार की या याचिकांवर उद्याच संपूर्ण निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

अधिक वाचा: सेनेचा ४१ वा आमदार फुटणार अन् शिंदे गटात सहभागी होणार?

तसेच शिवसेनेने देखील या प्रकरणी सुनावणी तातडीने घ्यावी अशी विनंती केली होती. मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी ही नियोजित वेळापत्रकानुसार होईल असे स्पष्ट केले होते. तसेच हे प्रकरण आणखी मोठ्या खंडपीठाकडे द्यायचे की नाही हे ठरवायचे आहे. असे मत न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं आहे. 

याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे ती सुनावणी देखील निवडणूक आयोगापुढे चालू आहे. मात्र न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये. असे स्पष्ट मत न्यायालयाने दिल्याने उद्या होणाऱ्या सुनावणीत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा: "आता CM घरी बसणार नाहीत, तुम्हालाही घरी बसू देणार नाही"

नेमकी याचिका काय?

शिवसेनेने शिंदे गटातील ४० पैकी १६ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली होती. तर दुसरीकडे व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी शिंदे गटाने शिवसेनेच्या १४ आमदारांवर कारवाई केली होती. त्यामुळेच नेमकं कोण अपात्र होणार यासाठीची मुख्य याचिका सुप्रीम कोर्टात सुरु आहे.

अधिक वाचा: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का;'हा' बडा नेता शिंदे गटात सहभागी

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्या दिल्यानंतर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असून आपलाच शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर हक्क आहे असा दावा केला आहे. यासाठी शिंदे गट निवडणूक आयोगाकडे देखील गेलं आहे. मागील सुनावणीत निवडणूक आयोगाने देखील या सगळ्या प्रकरणात त्यांची काय भूमिका आहे हे सुप्रीम कोर्टासमोर मांडलं होतं.

सरन्यायाधीश रामण्णा २६ ऑगस्टला होणार निवृत्त

दरम्यान, सध्याचे सरन्यायाधीश एन.व्ही.रामण्णा हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. सध्या महाराष्ट्रातील सत्तेबाबतच जो पेच न्यायलयसमोर सुरु आहे त्या सुनावणीत स्वत: सरन्यायाधीश रामण्णा न्यायमूर्ती म्हणून काम पाहत आहेत. तर २७ तारखेपासून उमेश लळीत हे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी