Heat rises in Mumbai, electricity demand crosses 3500 MW mark : उकाडा वाढल्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे सोमवार 10 एप्रिल 2023 रोजी मुंबईने विजेचा 3500 मेगावॅटचा टप्पा ओलांडला. यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईने पहिल्यांदाच विजेचा 3500 मेगावॅटचा टप्पा ओलांडला. याआधी एप्रिल 2022 मध्ये मुंबईने एकदा विजेचा 3800 मेगावॅटचा टप्पा ओलांडला होता. मागच्या आठवड्यात मुंबईची विजेची सरासरी मागणी 3200 मेगावॅट होती. या मागणीत सोमवारी 300 मेगावॅट एवढी वाढ झाली.
कपल्ससाठी मुंबईत फिरण्याचे BEST SPOTS
मुंबईतला राजवाडा आहे मुकेश अंबानींचे घर
सामान्य स्थितीत मुंबईची विजेची मागणी 2400 ते 2600 मेगावॅट असते. कोरोना काळात उन्हाळा वगळता एरवी कमाल विजेची मागणी ही 2800 ते 3 हजार मेगावॅट होती. मुंबईत 2022 च्या उन्हाळ्यात विजेची मागणी 3200 ते 3300 मेगावॅट होती.
या वर्षी मार्च 2023 पासूनच विजेची मागणी 3 हजार मेगावॅटच्या किंवा त्यापेक्षा जास्त होती. मुंबईने सोमवार 10 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी 3532 मेगावॅटचा टप्पा गाठला होता.
मुंबई शहर आणि उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे (एईएमएल) 30 लाख तर टाटा पॉवरचे साडेसात लाख आणि बेस्ट उपक्रमाचे साडेदहा लाख वीज ग्राहक आहेत. उच्चांकावेळी एईएमएलची 1633, टाटा पॉवरची 930 आणि बेस्ट उपक्रमाची 826 मेगावॅट एवढी विजेची मागणी होती.
मुंबईत वीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या महापारेषणच्या 400 किलोवॅटच्या चार वाहिन्या कार्यरत असतात. या व्यतिरिक्त टाटा पॉवरच्या 220 किलोवॅटच्या तीन वाहिन्या कार्यरत असतात. टाटा पॉवरने वाहिन्यांवर अतिरिक्त कंडक्टर बसवून त्यांची क्षमता प्रत्येकी 600 मेगावॅट केली आहे. सध्या मुंबईत 4200 मेगावॅट वीज बाहेरून आणणे शक्य होत आहे. पण यापेक्षा जास्त मागणी असल्यास विजेचा पुरवठा करणे आव्हानात्मक आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त जाणून घ्या ज्योतिबांचे प्रगल्भ विचार
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.