काळजी घ्या! राज्यातील 'या' जिल्ह्यांत तापमानात वाढ होऊन येणार उष्णतेची लाट

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 25, 2021 | 17:10 IST

Heat wave in Maharashtra: राज्यातील विविध भागांत सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणजे राज्यातील विविध भागांत तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Heat wave in Maharashtra
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांत तापमानात घट झाल्याचं पहायला मिळत असून वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच आता राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Heat wave in Maharashtra likely to raise the temperature in Konkan coming 2 days IMD alert)

आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K. S. Hosalikar) यांनी ट्विट करत माहिती दिली की, "एनसीयूएम NCMRWF हवामान मॉडेल मार्गदर्शनानुसार, कोकण भागावर ईशान्य व उत्तरेकडून गरम व कोरड्या वारा यामुळे मुंबईसह पुढील तीन दिवसांत कोकणातील तापमानात वाढ होऊ शकते."

पुढील दोन दिवसात महाराष्ट्रातील कोकणात (मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) उष्णतेची लाट येऊ शकते आणि परिणामी कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. पाहूयात हवामान विभागाने सविस्तर जिल्ह्यांनुसार वर्तवलेला अंदाज आणि इशारा.

२५ मार्च 

मुंबई - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 
रत्नागिरी - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 
सिंधुदुर्ग - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 

२६ मार्च 

मुंबई - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 
रायगड - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 
रत्नागिरी - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 
सिंधुदुर्ग - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 

२७ मार्च 

मुंबई - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 
रायगड - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 
रत्नागिरी - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 
सिंधुदुर्ग - काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. 

पालघरमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

आज २५ मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, दापोलीत ३८ अंश सेल्सिअस हून अधिक तापमानाची नोंद झाली. तर मुंबई (सांताक्रूझ) कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवस अशाच प्रकारे उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी