Maharashtra Weather : मुंबई : राज्यात (state) कोकणात (Konkan) अवकाळी पावसाचं (rain) संकट आहे तर दुसरीकडे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हवामान विभागाकडून (Meteorological Department) अलर्ट देण्यात आला आहे. राज्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये एक चिंताजनक बातमी आहे. आयएमडीनं राज्यात उष्णतेच्या लाटेचा (heat wave) इशारा दिला आहे. आजपासून 12 एप्रिल दरम्यान विदर्भात (Vidarbha) उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. वाशिम, वर्धा, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमान 42 अंशाहून अधिक आहे. अमरावतीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त आहे. उन्हाच्या तीव्र झळा कायम असताना किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पीके वाळत असल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. मात्र, आता उन्हापासून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. येत्या 13 एप्रिलनंतर उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र दक्षिण विदर्भात आणखी 5 दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं दिला.
विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटकपर्यंत सध्या हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात तापमानाचा पारा थोडा कमी होत असला तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. शनिवारी 14 जिल्ह्यांतील तापमान चाळिशीपार होते. अकोला आणि जळगाव येथे शनिवारी (ता. ९) उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगर, अमरावती, चंद्रपूर येथे आहे. ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३२ ते ४१ अंशांच्या आसपास आहे. बुलडाणा येथे तापमान ४० अंशांच्या पुढे आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.