Heat wave will come in Mumbai and Konkan or Kokan Region in the month of April : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासह कोकणात एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. दिल्लीसह आग्नेय भारतामध्ये एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उष्णतेचे प्रमाण सामान्य राहील. मात्र, पूर्वेकडचा भाग, मध्य भारत आणि महाराष्ट्र तसेच गुजरातच्या पश्चिमेकडील किनारपट्टीच्या भागात एप्रिल महिन्यात तापमान हे सामान्य पातळीपेक्षा अधिक राहील.
Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे
एप्रिल ते जून दरम्यान संपूर्ण भारतात तापमान हे सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल. एप्रिलच्या मध्यापासून सर्व राज्यांमधील तापमान वाढण्यासा सुरुवात होईल. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, गुजरात आणि हरयाणाच्या काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. केवळ दक्षिणेकडील किनारपट्टीचा काही भाग आणि ईशान्य भारतातील काही भाग याला अपवाद असतील. या भागांमध्ये तापमान सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स
उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे
जागतिक तापमानावर परिणाम करणारा ‘एल निनो’ तीन वर्षांनंतर यंदा पुन्हा प्रभावी होण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी (2023) तापमानात अचानक प्रचंड वाढ होण्याचा अंदाज आहे. एल निनोचा परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होतो. एल निनोचा प्रतिकूल परिणाम झाल्यास मान्सून लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही; असे हवामान विभागाने सांगितले.
निरोगी हृदयासाठी रमझानमध्ये खा हे पदार्थ
सहरी आणि इफ्तारमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये?
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.