Raigad Rain Fort : किल्ले रायगडावर तुफान पाऊस, पायर्‍यांवरुन वाहणार्‍या पाण्याचा व्हिडीओ व्हायरल

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी पावसाचे सुंदर रुप पहायला मिळत आहे. किल्ले रायगडावर मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे किल्ल्याच्या महादरवाजवरून खाली पायर्‍यांवर धो धो पाणी कोसळत आहे.

थोडं पण कामाचं
  • संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.
  • मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे.
  • असे असले तरी अनेक ठिकाणी पावसाचे सुंदर रुप पहायला मिळत आहे.

Raigad Fort Rain : मुंबई :  संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी पावसाचे सुंदर रुप पहायला मिळत आहे. किल्ले रायगडावर मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे किल्ल्याच्या महादरवाजवरून खाली पायर्‍यांवर धो धो पाणी कोसळत आहे. या पाण्यामुळे रायगडावरून जणू धबधबा वाहत असल्याचा भास होत आहे. किल्ले रायगडावर निसर्गाने उधळण केली असून पावसामुळे किल्ल्याचे सौंदर्य आणखीणच खुलले आहे. भर पावसातही शिवप्रेमींनी रायगडावर गर्दी केली आहे. (heavy rain at raigad fort video gone viral on social media)

संपुर्ण रायगड जिल्ह्याला तुफानी पावसान झोडपल्यानंतर नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.  डोंगर दऱ्यांमध्ये धबधबे कोसळत आहे.  पावसाळी पर्यटनची मौज मजा करायला पर्यटक रायगडमध्ये येत असुन अशाच एका हौशी पर्यटकाने किल्ले रायगडच्या महादरवाजाच्या खालच्या बाजुस बुरुज आणि पायऱ्यांवरून खळाळणाऱ्या पाण्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये चित्रीत केला आहे.  सोशल मिडीयावर व्हायरल होणारा हा दर्शकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी