Maharashtra Rains : पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भासह कोकणाला विशेष सुचना

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 25, 2022 | 11:05 IST

येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार (Rain Update) पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. विदर्भात (Vidarbha Rains) काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे.

Heavy rain forecast in the state in the next three days
पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
  • राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती.
  • गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे.

Maharashtra Rains : येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार (Rain Update) पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. विदर्भात (Vidarbha Rains) काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे.

मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवली आहे. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 

Read Also : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

गेल्या आठवड्यात विदर्भात (Vidarbha) पावसाचा अतीवृष्टी सदृश्य पाऊस कोसळला. विदर्भातील विविध जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला. विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), बुलडाणा (Buldhana), यवतमाळ (Yavatmal), भंडारा (Bhandara) या जिल्ह्यांमध्ये महापूराची स्थिती निर्माण झाली होती.  

Read Also : या 4 गोष्टींनंतर अंघोळ करायला विसरू नका, नाहीतर...

दरम्यान यंदाच्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात जुलैच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस आठ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान विखुरलेले आणि काही जिल्ह्यांपुरते मर्यादित असले तरी, सततच्या पावसाने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात

मागील आठ दिवसापासून गायब असलेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे.  रात्रीपासून जिल्ह्याचा अनेक भागांमध्ये सरींवरती पाऊस बरसत आहे. कोसळणाऱ्या सरी या जोरदार अशाच आहेत. सध्या देखील जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे.  खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरा जिल्हा माहिती कार्यालयाने जगबुडीबाबत दिलेली माहिती आहे. पाऊस पडत असला तरी जिल्ह्याच्या जनजीवनावरती मात्र कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1) -2, पालघर -1,रायगड- महाड- 2, ठाणे-2,रत्नागिरी-चिपळूण-2,कोल्हापूर-2,सातारा-1,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 12 टीम तैनात आहेत. नांदेड-1, गडचिरोली-1 अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी