Rain Prediction : येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढेल, हवामान तज्ज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांचा अंदाज

कालपासून मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पाणी साचले होते तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. परंतु येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

थोडं पण कामाचं
  • कालपासून मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे.
  • काही ठिकाणी पाणी साचले होते तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत.
  • येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

Heavy Rain : मुंबई :  कालपासून मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पाणी साचले होते तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. परंतु येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

जून महिन्यात 50 टक्क्यांहून अधिक खंड दिलेल्या पावसाने काल पासून राज्यभरात जोर धरला आहे. येत्या काही दिवसात देखील पावसाचा जोर वाढणार असून शुक्रवारी आणि शनिवारी कोकणात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. मुंबईसह ठाणे आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोमवार दुपारपासूनच या भागांमध्ये पवासाचा जोर सुरु असून मंगळवारी सकाळीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. जो पाऊस जून महिन्यात थांबला होता तो आता बरसायला सुरवात झाली आहे. मान्सूनचे पुनरागमन झाले आहे, असेही साबळे यांनी सांगितले. राज्यात पावसाचा पुनरागमन होत असून येत्या काळात शेतीच्या कामांना जोर येणार आहे. जो पाण्याचा प्रश्न काही दिवसांमध्ये तयार झाला होता तो पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे. आणि सप्टेंबर पर्यंत ज्या धरणांमध्ये आजच्या परिस्थितीत पाणी कमी आहे ती सर्व धरणे भरतील असेही साबळे यांनी नमूद केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी