Maharashtra Heavy Rain : मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस; जळगावमध्ये कोसळले झाड

आज मुंबई, ठाणे, पनवेलसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. जुनमध्ये दडी मारलेल्या पावसाने आज जोरदार आगमन केले होते. या पावसामुळे मुंबई, ठाण्यासहे अनेक भागात पाणी साचले होते. तसेच काही ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

maharashtra heavy rain
मुसळधार पाऊस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज मुंबई, ठाणे, पनवेलसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे.
  • जुनमध्ये दडी मारलेल्या पावसाने आज जोरदार आगमन केले होते.
  • या पावसामुळे मुंबई, ठाण्यासहे अनेक भागात पाणी साचले होते.

Maharashtra Heavy Rain : मुंबई :  आज मुंबई, ठाणे, पनवेलसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. जुनमध्ये दडी मारलेल्या पावसाने आज जोरदार आगमन केले होते. या पावसामुळे मुंबई, ठाण्यासहे अनेक भागात पाणी साचले होते. तसेच काही ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरही झाड पडल्याची घटना घडली आहे.

आज मुंबईत मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. मुंबईतील माटुंगा परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचले आहे. अंधेरीतही सबवे भागात पाणी साचले आहे, त्यामुळे दुचाकीस्वारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. कुर्ला भागात पाणी साचल्यामुळे अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

पनवेल भागातही चांगलाच पाऊस पडला. पनवेलमध्ये अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली होती तर जुना मुंबई पुणे महामार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर कोसळले मोठे झाड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोठे झाड कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर रस्ते साफ करण्याचे काम सुरु असताना झाड कोसळले झाड. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या गाडीवर झाड कोसळले. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आहे.

जळगावात स्टेशनरोडवर कोसळले झाड

जळगाव शहरात सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्याचा वेग वाढल्याने शहरातील सर्वाधिक वर्दळ व वाहतूक असलेल्या स्टेशनरोडवर झाड कोसळून एकेरी मार्गाची वाहतूक ठप्प झाली. दरम्यान पावसामुळे रस्त्यावर कोणीही नसल्याने प्राणहानी टळली. रात्री उशिरापर्यंत या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु होती. अजूनही भुसावळ तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शहरात सोमवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यांचा वेगही वाढला. यामुळे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडीत झाला. शहरातील सर्वांत महत्वाचा व वर्दळीचा मार्ग असलेल्या स्टेशनरोडवरील हनुमान मंदिर, डॉ खानापूरकर हॉस्पीटलच्या परिसरात रेल्वे संरक्षण भिंतीला लागून असलेला वृक्ष कोसळला. रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. वृक्ष कोसळला त्यावेळी जोरदार पाऊस सुरु असल्याने रस्त्यावरुन वाहतूक थांबली होती. यामुळे जिवितहानी टळली. दरम्यान कोसळलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे अर्धा रस्ता व्यापला गेला. अर्ध्या एकेरी रस्त्यावरुन वाहतूक सुरू झाली. याच दरम्यान एसटी बसेस किंवा चारचाकी वाहनांना वाहतूकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहतूकी कोंडी निर्माण झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी