Maharashtra Rain Updates: राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain)पडत आहे. मुंबईतही (Mumbai Rain Update) पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिमझिम होत आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक कोसळणाऱ्या अवकाळीच्या सरींमुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या (farmer) हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (Heavy rain in Mumbai, Thane, how many more days will it rain in Maharashtra?)
अधिक वाचा : black coffee वजन कमी करण्यास खरोखर आहे का उपयुक्त?
दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस थैमान घालू लागला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
अधिक वाचा : टक्कल पडू नये यासाठी वापरा हे 10 सर्वोत्तम नैसर्गिक केस तेल
राज्यातील विदर्भामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाने अंदाजही वर्तवला आहे. दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू ते छत्तीसगडपर्यंत विस्तारला आहे. यामुळे विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
अधिक वाचा : लग्नाला उशिर कराल तर बाप बनण्यास होईल अडचण
दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे 25 जिल्ह्यांतील एक लाख 39 हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे रब्बी तसेच बागायती शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यासह परभणीत जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच परभणी, अकोला, बुलढाणा, सातारा, धुळे, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातही पाऊस झाला आहे.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर या सर्व परिसरामध्ये पाऊस सुरू आहे. दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण परिसरात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
अधिक वाचा : मासिक पाळीच्या दरम्यान खाऊ नका ही फळं
हवामान खात्याच्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले. अरबी समुद्रावरून पश्चिमी वारे आद्रतेने वाहत असल्याने मुंबई शहर आणि उपनगर परिसरांसह आसपास पावसाने हजेरी लावली. शहरात पावसाच्या हजेरीनंतर आता पुढील काही दिवस निरभ्र आकाश पाहायला मिळेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.