Rain in Maharshtra : मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात पावसाने घेतली विश्रांती; येत्या आठवड्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या १५ दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी पूरही आला आहे तर काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. जुलैच्या १५ दिवसांत ३९२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आता आगामी आठवड्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

mumbai rain
महाराष्ट्र पाऊस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात गेल्या १५ दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे.
  • आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे.
  • आगामी आठवड्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Rain in Maharshtra : मुंबई : राज्यात गेल्या १५ दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी पूरही आला आहे तर काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. जुलैच्या १५ दिवसांत ३९२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आता आगामी आठवड्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (heavy rain predict in maharashtra by indian metrological department)

अधिक वाचा : राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

२० जुलैपर्यंत राज्यातील कोकण आणि विदर्भत विजांच्या कडकटांसह मध्यम आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात रविवार ते मंगळवार दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

अधिक वाचा : Beed : परळीसाठी 100 कोटींचा निधी आणला कोणी? ताई अन् भाऊ म्हणतो मी-मी; श्रेयवादावरुन मुंडे बहिण-भावात रस्सीखेच

मुंबईला यलो अलर्ट

गेल्या काही दिवसांत मुंबईसह ठाण्यात आणि आजूबाजूच्य परिसरात चांगलाच पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. त्यात अंधेरी सबवे, माटुंगा परिसरत पाणी साचले होते. तसेच जोरदार पावसाचा फटका लोकललाही बसला होता. पुढील पाच दिवसांत मुंबईत पावसाच्या हल्क्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने मुंबईसह सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसांत दिवसांत  १ हजार ११२.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जरी मुंबईत पाणी साचले होते तरी या पावसामुळे हळूहळू पाण्याची चिंता मिटत आहे.  

अधिक वाचा : हे काय सुरू आहे ? राज्यपालांना संजय राऊतांनी दाखवली राज्यघटना

तुळशी तलाव ओव्हरफ्लो

गेल्या १५-१६ दिवसांत मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठ करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तुळशी तलावातून मुंबईला दिरदिवशी ४० लाख गॅलन पाणीपुरवठा होता. यापूर्वी मोडकसागर आणि तानसा ही धरणेही भरली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या सातही तलावांची एकूण पाण्याची क्षमता ७८.६३ टक्के इतकी आहे.  

अधिक वाचा : Uday Samant : आमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आदर कायम राहणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी