मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना २ दिवसांच्या जोरदार पावसाचा अलर्ट

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 17, 2021 | 23:19 IST

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

heavy rainfall likely to mumbai thane palghar raigad on june 18 and 19
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना २ दिवसांच्या जोरदार पावसाचा अलर्ट 

थोडं पण कामाचं

  • मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना २ दिवसांच्या जोरदार पावसाचा अलर्ट
  • शुक्रवार १८ जून २०२१ आणि शनिवार १९ जून २०२१ या दोन दिवशी जोरदार पावसाची शक्यता
  • कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची शक्यता

मुंबईः मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (गुरुवार, १७ जून २०२१) दिवसभर मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत होत्या. आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. heavy rainfall likely to mumbai thane palghar raigad on june 18 and 19

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये शुक्रवार १८ जून २०२१ आणि शनिवार १९ जून २०२१ या दोन दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात मोसमी पावसाच्या सरी बरसत आहेत.

रविवार, सोमवारी ऊन पडल्यानंतर मंगळवारी मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या. बुधवारी आणि गुरुवारी मुंबईतील विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. दक्षिण भारतापासून अमृतसरपर्यंत मान्सून वेगाने पसरला आहे. कोकण, विदर्भात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

मुंबई: मुलुंडमध्ये भिंत कोसळून १ ठार

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार १७ जून २०२१) संध्याकाळी घडली. जोरदार पावसामुळे कमकुवत झालेली भिंत कोसळून ३५ वर्षांच्या दिलीप वर्मा यांचा मृत्यू झाला. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या दिलीप वर्मा यांना अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर मुलुंडच्या राहुल नगर परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहून काही नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी