Maharashtra Rain Update : आजही राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 12, 2022 | 06:53 IST

राज्यात आजही पावसाचा (Rain Update) जोर कायम राहणार असून रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोलीला (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

आजही राज्यात मुसळधार पाऊस कायम
आजही राज्यात मुसळधार पाऊस कायम   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं
  • गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
  • गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात आजही पावसाचा (Rain Update) जोर कायम राहणार असून रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोलीला (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पुणे- 

पुण्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे.  धरणातून 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. 

नाशिक-

जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरातील पहिली ते बारावीच्या सगळ्या शाळा आज बंद राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कायम असून धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

धुळे-  

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पालघर

जव्हार, मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथील नदीला मोठा पूर आला असून आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

Read Also : बकरी ईदच्या दिवशी अभिनेत्री हिना खान का झाली एवढी हळवी?

नंदुरबार 

हवामान खात्याने दिलेल्या इशारा नंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर नवापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन,नदी काठावरील. गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Read Also : खड्ड्याची तक्रार करा टोल फ्री नंबरवर; 48 तासात घेणार दखल

गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी