Weather Updates : राज्यातल्या 'या' भागात पुढील 5 दिवस पावसाच्या मुसळधार सरी, हवामान खात्याकडून अलर्ट

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 13, 2022 | 16:17 IST

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सूनच्या (Monsoon) पावसाने (Monsoon Rain) हजेरी लावली आहे. सोमवारपासून पुढील चार दिवस मुंबईमध्ये (Mumbai) हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्राच्या (Monsoon) किनारी भागातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Chance of torrential rain for next 5 days in some part of state
राज्यातल्या 'या' भागात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज
  • राज्यात येत्या पाच 5 दिवसासाठी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार
  • विदर्भ, मराठवाडा, सोलापूर अजून मान्सूनच्या प्रतिक्षेत

Weather Updates In Maharashtra: मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सूनच्या (Monsoon) पावसाने (Monsoon Rain) हजेरी लावली आहे. सोमवारपासून पुढील चार दिवस मुंबईमध्ये (Mumbai) हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्राच्या (Monsoon) किनारी भागातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असा अंदाज  आहे. तसेच कोकणात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात येत्या पाच 5 दिवसासाठी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडत आहे. अद्यापही विदर्भ, मराठवाडा, सोलापूर या भागात मान्सूनला सुरुवात झालेली नाही. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत मान्सूनला या भागातही सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. (Mumbai Weather) मान्सूनची चाहुल लागली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain in Mumbai) झाला. जोरदार वारे वाहत आहेत. यातच आता हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी एक इशारा दिला आहे.

राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, मॉन्सून तळ कोकणात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातही वादळी वारे, मेघगर्जना विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी