सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई
Updated Sep 29, 2020 | 15:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

CET Exam: राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

सीईटी परीक्षा
सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी 

थोडं पण कामाचं

  • या १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घेतल्या जाणार होत्या.
  • कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सीईटीच्या परीक्षा रखडल्या होत्या.
  • आता सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. 

मुंबई: सीईटीची परीक्षा(cet exam) देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या(mahrashtra government) उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याआहेत.. याआधी या सीईटी परीक्षा (CET Exam) या १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घेतल्या जाणार होत्या. तसेच अखेरच्या वर्षाच्या परीक्षा १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान घेतल्याजाणार होत्या. मात्र आता सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. 

सीईटीच्या परीक्षा आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा एकाचवेळेस येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यानअभियांत्रिकी, औषधनिर्मिती शास्त्र प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षेच्या वेळापत्रक बदललेले नाही. या परीक्षा १ ते २० ऑक्टोबरदरम्यान घेतल्या जाणार आहेत. 

सीईटी परीक्षा तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी चांगलेच गोंधळात होते. जे विद्यार्थी अंतिम वर्षाचे आहेत ते सीईटीची परीक्षा कशी देऊ शकतात याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होता. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत होते. 

बदललेले वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा

कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सीईटीच्या परीक्षा रखडल्या होत्या. सुरूवातीला जूनमध्ये ही परीक्षा घेतली जाणार होती.त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात ढकलण्यात आली. मात्र राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने परीक्षा आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता नंतर ऑक्टोबरमध्ये या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बदललेले वेळापत्रक

एम आर्च सीईटी -  २७ ऑक्टोबर २०२०
एम एचएमसीटी २७ ऑक्टोबर २०२०
एमसीए सीईटी  २८ ऑक्टोबर २०२०
बीएचएमसीटी  १० ऑक्टोबर २०२०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी