High Alert : मुंबईत हाय अलर्ट, पोलिसांच्या सुट्या रद्द

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 31, 2021 | 18:20 IST

High Alert in Mumbai : खलिस्तान समर्थक आणि पाकिस्तान समर्थक मुंबईत घातपात करण्याची शक्यता आहे; अशी माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. ही माहिती मिळाल्यामुळे मुंबई 'हाय अलर्ट'वर आहे.

High Alert in Mumbai
High Alert : मुंबईत हाय अलर्ट, पोलिसांच्या सुट्या रद्द  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • High Alert : मुंबईत हाय अलर्ट, पोलिसांच्या सुट्या रद्द
  • खलिस्तान समर्थक आणि पाकिस्तान समर्थक मुंबई तसेच देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये घातपात करण्याची शक्यता
  • खलिस्तान समर्थकांचे नेते आणि निवडक सक्रीय कार्यकर्ते आयएसआयच्या संपर्कात

High Alert in Mumbai : मुंबई : खलिस्तान समर्थक आणि पाकिस्तान समर्थक मुंबईत घातपात करण्याची शक्यता आहे; अशी माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. ही माहिती मिळाल्यामुळे मुंबई 'हाय अलर्ट'वर आहे. मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व पोलिसांना ताबडतोब आपापल्या पोलीस ठाण्यात हजर होऊन पुढील आदेशाचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

लवकरच खलिस्तान समर्थक आणि पाकिस्तान समर्थक मुंबई तसेच देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये घातपात करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेने ही माहिती दिल्यामुळे मुंबईसह देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट आहे. सुरक्षा यंत्रणा जास्त खबरदारी घेत आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

पंजाबमध्ये लुधियाना कोर्टात बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी जर्मनीतील एका खलिस्तान समर्थकाला अटक करण्यात आली आहे. सिख फॉर जस्टिस अर्थात एसएफजे या संघटनेचा सदस्य असलेल्या अटकेतील आरोपीने पोलिसांना बरीच संवेदनशील माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर यंत्रणेने आणखी तपशील मिळवले आणि धोक्याचा इशारा दिला. 

खलिस्तान समर्थकांचे नेते आणि निवडक सक्रीय कार्यकर्ते आयएसआयच्या संपर्कात आहेत. हे सर्वजण एकत्र येऊन भारतात घातपात करण्याचा प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे.

भारत सरकारने सिख फॉर जस्टिस अर्थात एसएफजे या संघटनेवर त्यांच्या दहशतवादी कारवायांची दखल घेऊन बंदी घातली आहे. मुंबई आणि दिल्ली तसेच पंजाबमध्ये जास्त खबरदारी घेतली जात आहे. मुंबईत सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द झाल्या आहेत त्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रॅपिड अॅक्शन फोर्स (शीघ्र कृती दल) आणि बॉम्ब स्क्वाड (बॉम्ब शोधक पथक / स्फोटके शोधून निकामी करणारे पथक) यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी